Marathwada News : मराठवाड्यात ३३४ दिवस पुरेल एवढाच चारा शिल्लक

प्रशासनाकडून ६५ लाख पशुधनासाठी चाऱ्याचे नियोजन
Marathwada News
Marathwada News : मराठवाड्यात ३३४ दिवस पुरेल एवढाच चारा शिल्लकfile photo
Published on
Updated on

Only enough fodder to last 334 days remains in Marathwada

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने विभागीय प्रशासनाने पशुधनासाठी चार्‍याच्या नियोजनाला सुरुवात केली आहे. विभागातील तब्बल ६५ लाख ५० हजार १९९ जनावरांसाठी दरमहा ७ लाख ७१ हजार ७५९ मेट्रीक टन चार्‍याची आवश्यकता भासणार असून, सध्या उपलब्ध साठा ३३४ दिवस पुरेल इतका असल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांकडून देण्यात आली.

Marathwada News
Sambhajinagar News : भरपूर पावसानंतरही मराठवाडा तहानलेला

मराठवाड्यात गाय व म्हशींची संख्या सर्वाधिक असून ती ३३ लाख २९ हजार ८६२ इतकी आहे. त्याखालोखाल शेळी व मेंढ्यांची संख्या २३ लाख ८ हजार ५४४ इतकी आहे. तर लहान जनावरांची संख्या ९ लाख ११ हजार ७९३ इतकी नोंदविण्यात आली आहे. या सर्व पशुधनासाठी मोठ्या प्रमाणावर चास्याची गरज भासणार असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

दरम्यान, वैरण विकास योजनेअंतर्गत विभागात ९ कोटी ८८ लाख रुपयांच्या बियाण्यांचे वितरण करण्यात आले आहे. या माध्यमातून ७४ लाख ९० हजार ६४३ मेट्रीक टन अतिरिक्त चारा उपलब्ध होईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Marathwada News
Marathwada rural water shortage : मराठवाड्यात 48 टँकरने पाणीपुरवठा

संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन तालुका आणि जिल्हास्-तरावरही चारा उपलब्धतेचा आढावा घेतला जात आहे. मराठवाड्यात सर्वाधिक पशुधन बीड जिल्ह्यात असून, त्याखालोखाल छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये चास्याच्या उपलब्धतेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news