Marathwada Water Storage : मराठवाड्यातील मोठ्या धरणांमध्ये केवळ ३३.३२ टक्के उपयुक्त जलसाठा

गेल्यावर्षी याच दिवशी ४२.२८ टक्के साठा; जायकवाडीत २१ टक्के, येलदरीत ५१ टक्के पाणी
Marathwada Water Storage
Marathwada Water Storage : मराठवाड्यातील मोठ्या धरणांमध्ये केवळ ३३.३२ टक्के उपयुक्त जलसाठाfile photo
Published on
Updated on

Only 33.32% usable water storage in major dams of Marathwada

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यात जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचा परिणाम धरणांतील जलसाठ्यावरही दिसून येत आहे. विभागातील ११ प्रमुख प्रकल्पांमध्ये रविवारी (दि.२८) सकाळी आठ वाजेपर्यंत केवळ ३३.३२ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध असून, गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ४२.२८ टक्के होता. त्यामुळे यंदा जलसाठ्यात सुमारे नऊ टक्क्यांची घट झाली आहे.

Marathwada Water Storage
Nanded News : केवळ १० टक्के पाऊस; २९ टक्के जलसाठा, पेरण्या लांबल्या

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अहवालानुसार, विभागातील ११ प्रमुख धरणांची एकूण उपयुक्त साठवण क्षमता ५,१५६ दशलक्ष घनमीटर असून, त्यापैकी सध्या १,७१८ दशलक्ष घनमीटर (६०.५९ टीएमसी) इतकाच उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात ६०९ दशलक्ष घनमीटर (२१.५२ टीएमसी) म्हणजे २८.०७ टक्के, तर उपयुक्त साठा २१.५२ टक्के आहे. गेल्या वर्षी याच दिवशी जायकवाडीत ४०.९८ टक्के जलसाठा होता.

येलदरी धरणात सर्वाधिक ५१.४६ टक्के, पेनगंगा धरणात ४३.४७ टक्के, मांजरा धरणात १९.२५ टक्के, माजलगावमध्ये १९.३९ टक्के, तर निम्न दुधना धरणात २५.१८ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.

Marathwada Water Storage
Marathwada Water Crisis : मराठवाड्यावर टंचाईचे भीषण संकट

दुसरीकडे सिद्धेश्वर धरण पूर्णपणे रिकामे असून त्यामध्ये उपयुक्त जलसाठा शून्य टक्के आहे. यंदा जून महिन्यात मराठवाड्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने धरणांमध्ये अपेक्षित आवक झालेली नाही. त्यामुळे आगामी काळात जुलै महिन्यात चांगला पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्यासह सिंचनाच्या नियोजनासमोर आव्हान निर्माण होण्याची शक्यता जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news