

Notices issued to eight Gram Sevaks, 13 Sarpanch and 4 Extension Officers
नितीन थोरात
वैजापूर : दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींमध्ये ३४ लाख ४१ हजार रुपयांचा घोटाळा झाल्याची बाब उघडकीस आली. या प्रकरणी तालुक्यातील ८ ग्रामसेवक, ४ १३ सरपंचासह विस्तार अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, १७ जुलै रोजी वैजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. कृष्ण वेणीकर यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या मआपले सरकार सेवा केंद्रफ कार्यालयांच्या पारदर्शकतेची तपासणी करण्यासाठी एक बैठक घेतली.
या बैठकीस मआपले सरकार सेवा केंद्रफ्चे जिल्हा समन्वयकही उपस्थित होते. या बैठकीदरम्यान गटविकास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास एक गंभीर बाब आली. ती म्हणजे, ग्रामपंचायतींकडून संगणक परिचालकांना (ऑपरेटर) दिल्या जाणाऱ्या मानधनात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समोर आले.
ई-स्वाक्षरीच्या माध्यमातून संबंधित काम करणाऱ्या संस्थांना रक्कम वर्ग केली जाते. ही ई-स्वाक्षरी सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्या नावे असते. त्यामुळे प्रत्येक व्यवहारानंतर सरपंच व ग्रामसेवक यांच्या मोबाईलवर संदेश जातो. असे असतानाही, एका संगणक परिचालकाने १३ ग्रामपंचायतींच्या मानधनाची एकूण ३४ लाख १९ हजार रुपये स्वतःच्या खात्यात वर्ग केल्याचे समोर आले.
यामुळे गटविकास अधिकारी डॉ. कृष्ण वेणीकर यांनी संबंधित सर्वांनाच कारणे दाखवा नोटीस बजावल्या असून, २४ तासांत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. लवकरच याप्रकरणी चौकशी करून दोषींवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात ८ ग्रामसेवक, १३ सरपंच आणि ४ विस्तार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या सर्वांना २४ तासांत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
चोरवाघलगाव, हाजीपूरवाडी, आंचलगाव, रघुनाथपुरवाडी, मनेगाव, खरज, भिवगाव, अव्वलगाव, सटाणा, भग्गाव, बेलगाव, वडजी, तलवाडा.