

Nine house burglaries in one night in four villages including Shivna
शिवना, पुढारी वृत्तसेवा अजिंठा बुलडाणा राज्य मार्गावरील मोठ्या बाजारपेठा असलेल्या चार गावांत गुरुवारी रात्री (दि. दहा) अज्ञात चोरट्यांनी एका बीअर बारसह कृषी साहित्य विक्रीची दुकाने व एक राहते घर फोडून पोलिसांना थेट आवाहन दिले आहे.
सहा महिन्यांपूर्वी अजिंठा रोडवरील संत धोंडिबाबा मंदिराजवळचे एक गॅरेज फोडून चोरट्यांनी लाखोंचा माल लंपास केला होता. त्याच रात्री त्यांनी दोन दुचाकीही पळविल्या होत्या. शुक्रवारी सकाळी पुन्हा सीरियल चोरीच्या या घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अजिंठा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजिंठा बुलडाणा राज्यमार्गावर असलेल्या अजिंठा, शिवना, भोरखेडा व धावडा या चार गावांत चोरटयांनी रात्रभर धुमाकूळ घातला. अजिंठा येथील गांधी चौकातील मुख्य बाजारपेठेतील तब्बल सात दुकाने, शिवना येथील संत धोंडिबा महाराज मंदिर परिसरातील सुपडू सपकाळ यांचे घर, मादनी गावालगतचे ओम साई ठिबक एजन्सी, खुपटा रोडवरील सत्यम बार व धावडा या गावातील कृषी साहित्य विक्रीची दोन दुकाने फोडली.
या चोरीत लाखोंचा माल चोरट्यांनी चोरून नेल्याची माहिती आहे. ओम साई एजन्सीचे शटर वाकवून चोरट्यांनी सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हिआर व संगणक फोडला. पोलिस दिवसभर या राज्यमार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपसणी करत होते.