NEET UG 2026 | ‘नीट’ गुण तफावत : ‘एनटीए’ला औरंगाबाद खंडपीठाची नोटीस

NEET UG 2026 |
NEET UG 2026 | ‘नीट’ गुण तफावत : ‘एनटीए’ला औरंगाबाद खंडपीठाची नोटीस
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : ‘नीट-यूजी २०२६’ परीक्षेतील गुणांमध्ये तफावत असल्याचा दावा करणाऱ्या याचिकेची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एन. बी. सूर्यवंशी आणि न्यायमूर्ती आबासाहेब शिंदे यांनी केंद्र सरकारच्या उच्च शिक्षण विभागाचे सचिव व नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) यांना नोटीस बजावली आहे. तसेच याचिकाकर्त्याची मूळ ओएमआर उत्तरपत्रिका एका आठवड्याच्या आत न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले.

सोहम गवते याने वैद्यकीय प्रवेशासाठी २१ जून रोजी ‘नीट’ची परीक्षा दिली. १४ जुलै रोजी मिळालेल्या ओएमआर शीट आणि १६ जुलै रोजी प्रसिद्ध झालेली अधिकृत उत्तरपत्रिका यांची पडताळणी केली असता, त्याने सोडविलेल्या १४८ पैकी १३६ उत्तरे अचूक होती तर २२ उत्तरे चुकीची असल्याचे स्पष्ट झाले. ऋण गुणांनुसार त्याला ५२२ गुण अपेक्षित होते. प्रत्यक्षात गुणपत्रिकेत त्याला केवळ ९५ गुण देण्यात आले. यासंदर्भात त्याने याचिका करून उत्तरपत्रिकेची फेरतपासणी आणि दुरुस्त गुणपत्रिका मिळण्याची विनंती केली आहे.

गुरुवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने प्रतिवादी म्हणून युनियन ऑफ इंडियामार्फत उच्च शिक्षण विभागाचे सचिव, नवी दिल्ली तसेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी, नवी दिल्ली यांना नोटीस बजावली. तसेच, याचिकाकर्त्याची मूळ ओएमआर उत्तरपत्रिका एका आठवड्यात न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news