

NCP state president Shashikant Shinde assures to raise the issue of mob lynching
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील मॉब लिचिंगचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्याचे आश्वासन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिले असल्याची माहिती राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस सय्यद तौफिक यांनी दिली.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील मॉब लिंचिगमध्ये केलेल्या हत्याप्रकरणी मुख्य आर-ोपींना वाचवण्याचा प्रयत्न जामनेरचे पोलिस निरीक्षक मुरली कासार यांनी केले आहे. तसेच कासार यांच्या कार्यकाळात जामनेर येथे अनेक दंगली घडल्या. त्याच बरोबर शहरात दुर्गा दौड या कार्यक्रमात तरुणांनी तलवारी फिरवल्या. या तरुणांवर कासार यांनी पुष्पवृष्टी केली.
कायदा हातात घेणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करून कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शिंदे यांना दिले. यावर त्यांनी विधान परिषदेत मुद्दा उपस्थित करण्याचे आश्वासन अल्पसंख्याक विभागाच्या शिष्टमंडळाला दिले. या शिष्टमंडळात सय्यद तौफिक, निसार अहमद, जुबेर मोतीवाला, शेख नईम मॉर्डनवाले यांची प्रमुख उपस्थिती होती.