Nanded Bribery Case : केंद्रीय विद्यालयाच्या माजी प्राचार्याला एक वर्ष सक्तमजुरी

नांदेडच्या केंद्रीय विद्यालयातील फर्निचर बिलासाठी लाच प्रकरण ; 15 वर्षांनंतर सीबीआय कोर्टाचा निकाल
Nanded Bribery Case
केंद्रीय विद्यालयाच्या माजी प्राचार्याला एक वर्ष सक्तमजुरीpudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : नांदेड येथील केंद्रीय विद्यालयातील फर्निचर बिल मंजूर करून देण्यासाठी 4 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी तत्कालीन प्राचार्य विनायक रायप्पा कट्टीमणी याला सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश संजय के. कुलकर्णी यांनी एक वर्षांची सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली 30 हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. तब्बल 15 वर्षे सुरू असलेल्या या भ्रष्टाचार प्रकरणाचा अखेर निकाल लागला.

नांदेड येथील केन्द्रीय विद्यालयातील माजी प्रभारी प्राचार्य तथा आरोपी विनायक कट्टीमणी याने फर्निचर पुरवठादार गौस खान अजिज खान अब्दुल्ला खान यांच्याकडे बिल मंजुरीसाठी लाचेची मागणी केल्याचे समोर आले होते. संबंधित कंत्राटदाराने ऑक्टोबर 2011 मध्ये शाळेला टेबल व खुर्च्यांचा पुरवठा केला होता. त्यासाठी सुमारे 43 हजार रुपयांचे बिल प्रलंबित होते.

Nanded Bribery Case
Hingoli news | माहिती दडविल्याप्रकरणी नगरपरिषदेच्या कार्यालयीन अधीक्षकांना ३० हजारांचा दंड

हे बिल मंजूर करून देण्यासाठी कट्टीमणी यांनी सुरुवातीला 4500 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र तडजोडीनंतर ही रक्कम 4 हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली. दरम्यान, कंत्राटदाराने या प्रकरणाची तक्रार सीबीआयकडे केली. त्यानुसार नागपूर सीबीआयने सापळा रचून कट्टीमणी याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. प्रकरणात सीबीआयच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने 24 नोव्हेंबर 2011 रोजी गुन्हा दाखल केला.

20 डिसेंबर 2014 रोजी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 तसेच कलम 13(1) (ड) सह 13(2) अंतर्गत आरोप निश्चित केले होते. त्यानंतर दीर्घकाळ खटल्याची सुनावणी सुरू होती. सुनावणीवेळी सीबीआयचे विशेष सरकारी अभियोक्ता अरविंद कुमार यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवून पुरावे सादर केले. सुनावणीअंती विशेष न्यायालयाने आरोपी विनायक कट्टीमणी याला दोषी ठरवले.

Nanded Bribery Case
Marriage Fraud Abuse Case | लग्नाच्या आमिषाने फसवणूक, अत्याचार; आरोपीला सक्तमजुरी

एक वर्ष सक्तमजुरी, 30 हजारांचा दंड

न्यायालयाने आरोपीला कलम 7 अंतर्गत सहा महिन्यांची सक्तमजुरी व 20 हजार रुपयांचा दंड, तसेच कलम 13 (1) (ड) सह 13(2) अंतर्गत एक वर्ष सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news