

छत्रपती संभाजीनगर : मकरसंक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या वाढलेल्या मागणीसाठी नांदेड-काकिनाडा टाऊन-नांदेड विशेष गाडी निझामाबाद, चेरलापल्ली, गुंटूर, विजयवाडामार्गे धावणार आहे. संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून ही विशेष रेल्वे या मार्गावरून सोडण्यात आली
ही विशेष गाडी प्रवाशांच्या सोयीसाठी १२ जानेवारी नांदेड-काकिनाडा टाउन (सोमवार) आणि काकिनाडा टाउन-नांदेड मंगळवारी १३ जानेवारी रोजी एक फेरी पूर्ण करणार आहे. या विशेष गाडीचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.