Nagesh Patil Ashtikar | खासदार आष्टीकरानांही लावला लाखोंचा चुना

पद्मश्री आणि राज्यसभेची ऑफर देत अनेकांकडून पैसे उकळल्याचा नवा कारनामा उघड
छत्रपती संभाजीनगर
Nagesh Patil Ashtikar | खासदार आष्टीकरानांही लावला लाखोंचा चुनाPudhari News Network
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : पंचतारांकित हॉटेलात सहा महिने मुक्काम ठोकणाऱ्या, पाकिस्तान, अफगाणिस्तान कनेक्शन असलेल्या कल्पना भागवतने आयएएस अधिकारी असल्याचे सांगून राज्यातील काही नेत्यांनाही चुना लावला असून, हिंगोलीचे ठाकरे गटाचे खासदार नागेश आष्टीकर यांच्याकडून १ लाख ४५ हजार उकळल्याचे समोर आले आहे. यासोबतच तिने नागपूर, अमरावती, अहिल्यानगरच्या अनेक नेत्यांना गंडा घातल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धक्कादायक म्हणजे कल्पना भागवत हिच्याकडे केंद्राच्या ऊर्जा मंत्रालयाच्या सचिवांच्या नावाने बनावट पत्रही आढळले आहे. त्यामुळे कल्पनाचे दररोज नवनवीन कारनामे उघड होत आहेत.

दिल्ली येथे ड्रायफ्रूटचा व्यवसाय करणारा अफगाणिस्तानचा अशरफ खील याच्यासोबत तिची मैत्री झाली. त्यानंतर तिच्या बँक खात्यात ३२ लाखांची उलाढाल झाली. अशरफचा पाकिस्तानमधील भाऊ गालिब यमा याच्यासोबत ती सातत्याने संपर्कात होती. त्याच्यासोबतच चॅटिंग तिने डिलिट केल्याचे समोर आले. तिच्या मोबाईलमध्ये अपना डीलर पाकिस्तान में हैं, मालूम है ना, असा मजकूर असलेला स्क्रीन शॉट आढळून आला. तसेच पाकिस्तान आर्मीसह अफगाण दूतावास, दुबईसह ११ संशयास्पद नंबर तिच्या मोबाईलमध्ये सापडल्याने प्रकरण गंभीर बनले आहे. दरम्यान, तिला ज्या लोकांनी पैसे पाठविले त्यांची चौकशी केली जात आहे. या यादीमध्ये हिंगोलीचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे नावही समोर आले आहे. त्यांच्याकडून कल्पनाने १.४५ लाख रुपये घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. नेमके हे पैसे कशासाठी पाठविले होते, याची माहिती पोलिसांकडून घेतली जाणार आहे. त्यासाठी खासदार आष्टीकर यांनाही चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

माणुसकीच्या दृष्टिकोनातून मदत केली : भोकर येथे रेल्वेतून प्रवास करताना एका नातेवाइकांना कल्पना भेटल्या होत्या. त्यांनी रामभद्राचार्य महार-ाजांचे शिष्य असल्याचे सांगितले. त्यानंतर मंदिर बांधकामासाठी मदत हवी असल्याचे सांगितले. त्यासाठी आपल्याकडून पैसे घेतले. त्यानंतर आयएएससाठी निवड झाली असून, वडिलांचे निधन झाल्यामुळे हाती पैसे नाहीत, मुलाखतीस जाण्यासाठीही आर्थिक अडचण असल्याचे सांगून त्यांनी पैसे घेतले. तिचा कोल्हापूरला अपघात झाल्याचे सांगून हॉस्पिटलसाठी पैसे मागितल्याने काही रक्कम दिली होती. वर्षभरात तिला ७० हजारांच्या आसपास पाठवले असतील.

नागेश पाटील आष्टीकर, खासदार, हिंगोली

नागेश आष्टीकर माझे दादा : कल्पना भागवत

पोलिस कस्टडीत असलेल्या कल्पना भागवतने सिडको पोलिस ठाण्याच्या बाहेर बुधवारी (दि.३) माध्यमांना प्रतिक्रिया दिली. तिला पत्रकारांनी विचारणा केली तेव्हा तिने नेत्यांनी मला पैसे दिले हे आरोप फेटाळून लावले. हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर हे माझे दादा आहेत. त्यांनी मला मदत केल्याचा दावा तिने केला आहे. तसेच मी कोणतेही खोटे काम केलेले नाही, असेही तिने म्हटले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news