Mylan Pharma : मायलान फार्मा कंपनीतील अधिकाऱ्यांची होणार चौकशी, पुढारीच्या बातमीवर शिक्कामोर्तब

कंपनीत पोलिसांकडून ६ तास झाडाझडती
Mylan Pharma : मायलान फार्मा कंपनीतील अधिकाऱ्यांची होणार चौकशी, पुढारीच्या बातमीवर शिक्कामोर्तब
Published on
Updated on

Mylan Pharma officials to be questioned

छत्रपती संभाजीनगर / वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : मायलान फार्मा कंपनीतील गोळ्यांची पावडर मेडिकल वेस्टच्या माध्यमातून बाहेर काढून एमडी ड्रग्सचा गोरखधंदा करणाऱ्या रॅकेटमध्ये कंपनी चौकशीच्या फेऱ्यात असे वृत्त पुढारीने प्रकाशित करताच गुरुवारी (दि.२६) गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार, गीता बागवडे यांचे पथक चार आरोपींना घेऊन थेट कंपनीत घडकले होते.

Mylan Pharma : मायलान फार्मा कंपनीतील अधिकाऱ्यांची होणार चौकशी, पुढारीच्या बातमीवर शिक्कामोर्तब
Shri Sant Eknath Maharaj Palkhi : पालखी मुक्कामासाठी खर्डा भुईकोट किल्ल्याच्या पायथ्याशी

कंपनीतून ड्रग्स बाहेर कसे पडत होते? मेडिकल वेस्टची प्रक्रिया काय ? कंपनीच्या कामकाजाची माहिती घेतली. त्यानंतर संबंधित उच्चपदस्थ अधिकारी-कर्मचाऱ्यांना शुक्रवारी गुन्हे शाखेत चौकशीसाठी हजर राहण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. सुमारे सहा तास पोलिस अधिकारी कंपनीत झाडाझडती घेत होते. पोलिस कंपनीत आल्याची माहिती मिळताच कंपनीचे दोन विधी सल्लागार दाखल झाले होते. दरम्यान, पोलिसांनी काही कागदपत्रेही सोबत नेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे कंपनीचे धाबे दणाणले आहेत.

वाळूज एमआयडीसीतील मायलान कंपनीतील भंगार उचलण्याचे कंत्राट बबन खान याने घेतले आहे. तो कंपनीमधून गोळ्यांच्या पावडरची येथील भंगारच्या गोडाऊनमध्ये जमा करत होता. तेथून ड्रग्स विक्रीसाठी मुंबई, गुजरातसह अन्य ठिकाणी पाठविण्यात येत होती. एनडीएपीसच्या पथकाने छापेमारी करत २ किलो ४७३ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले.

Mylan Pharma : मायलान फार्मा कंपनीतील अधिकाऱ्यांची होणार चौकशी, पुढारीच्या बातमीवर शिक्कामोर्तब
Chhatrapati Sambhajinagar : सव्वीस गावांच्या प्रगतीला मिळणार गती, महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात समावेश

एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल केला. बबन खान नजीर खान (६५), त्याची दोन मुले कलीम खान बबन खान (४१), सलीम खान बबन खान (३५, तिघेही रा. जुना बाजार), वाहन चालक शफीफुल रहेमान तफज्जुल हुसेन (४५) आणि राज रामतीरथ अजुरे (३८, दोघेही रा. उत्तरप्रदेश) अशी आरोपीची नावे आहेत. त्यांना २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आ लेली आहे.

गुरुवारी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार, एनडीपीएस पथकाच्या निरीक्षक गीता बागवडे, एपीआय रविकांत गच्चे, काशिनाथ महांडुळे यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक मायलान कंपनीत दुपारी एकच्या सुमारास पोहोचले. आरोपी कलीम खान, सलीम रहेमान व राज अजुरे या चार आरोपींनाही सोबत आणले होते. पोलिसांनी कंपनीतील कामाची पद्धत जाणून घेतली. कोणत्या प्रकारची रसायने येतात?, मेडिकल वेस्ट बाहेर कसे जाते याची माहिती घेतली.

कोणत्या कामाची कोणावर जबाबदारी? यासह सर्व प्रक्रियेची माहिती घेण्यात आली. त्यानंतरच कंपनीतील अधिकाऱ्यांना चौकशीच्या नोटीस बजावल्या. रात्री आठ वाजेपर्यंत कंपनीतील काही अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची पथकाकडून चौकशी सुरू होती. दरम्यान सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दोन विधी सल्लागार कंपनीत आले होते. त्यांनी कंपनीतर्फे कायदेशीरपणे बाजू मांडल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, एपीआय मोहसीन सय्यद यांनी कारवाईत जात केलेल्या ड्रग्ससह मुद्देमालाचा न्यायालयात जाऊन इन्व्हेंटरी पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण केली. तर पोलिसांनी कंपनीतून काही कागदपत्रेही सोबत आणली आहेत.

आज गुन्हे शाखेत हजेरी

कंपनीतून ड्रग्स पावडर बाहेर जात असल्याची गंभीर बाब समोर आल्याने मायलान कंपनीच्या अडचणी वाढल्या आहेत. पोलिसांनी झाडाझडती घेतल्यानंतर कंपनीतील उच्चपदस्थ चार अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. शुक्रवारी गुन्हे शाखेत या अधिकाऱ्यांचे जबाब घेतले जाणार आहेत. त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असलयाचे सूत्रांनी सांगितले.

मुंबईत खानचे नेटवर्क

बबन खानच्या गोदामातून ड्रग्स मुंबईच्या धारावीत पंटरकडे पोहोच केले जायचे. तेथून ते परराज्यातही पाठिवले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी मुंबईत असताना खानचे काही कारनामे आहेत का, याबाबत माहिती काढणे सुरू केले आहे. खानविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात २०१३ साली एक फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मात्र त्याचा तपशील मिळू शकलेला नाही.

फार्मा कंपन्यांतच सापडले होते २५० कोटींचे ड्रग्स

डीआरआयच्या पथकाने दोन वर्षांपूर्वी पैठण एमआयडीसी भागात फार्मा कंपन्यांवर छापेमारून २५० कोटींचे ड्रग्स जप्त केले होते. हिनहोरिया या मास्टरमाइंडसह चौघांना अटक केली होती. वेगवेगळ्या १५ रसायनांच्या घटकांना एकत्र करून एमडी ड्रग्सचा फॉर्म्युला तयार केला जातो. त्यामुळे औषधी कंपन्यांमधूनच काही जण ड्रग्जचा गोरखधंदा करत असल्याचे पुन्हा एकदा या कारवायांवरून समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news