Naregaon garbage depo : नारेगाव येथील कचरा डेपो बनला उमेदवारांची डोकेदुखी

मतदारांच्या प्रश्नांसमोर जुन्यांसह, नवखेही हतबल
Muncipal Election
Naregaon garbage depo : नारेगाव येथील कचरा डेपो बनला उमेदवारांची डोकेदुखीFile Photo
Published on
Updated on

Municipal Election: The garbage dump in Naregaon has become a headache for the candidates

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नारेगावचा काही भाग प्रभाग ८ आणि ९ मध्ये येतो. येथील कचरा डेपोचा त्रास दोन्ही प्रभागांतील नागरिकांना सहन करावा लागत आहे. हा कधी हलवणार किंवा याचा काय बंदोबस्त करणार, असे प्रश्न विचारून मतदार उमेदवारांना भंडावून सोडत असल्याने जुन्यासह नवख्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. त्याचा बंदोबस्त करू, असे सांगून ते वेळ मारून नेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Muncipal Election
निवडणुकीची रणधुमाळी, थंडीची लाट अन् व्हायरल साथीचा फैलाव

प्रभाग ८, ९ मध्ये अनेक समस्या आहेत. अर्धवट रस्ते, पाण्याची समस्या, पार्किंग आदी समस्या सतावत आहेत. असे असताना मात्र निवडणूक रिंगणात उतरलेले उमेदवार मात्र व्यायामशाळा काढू, नवीन घरकुल देऊ, तरुणांसाठी रोजगारांच्या संधी उपलब्ध करू अशा आश्वासनांची खैरात करत आहेत.

मतदार मात्र ते जाऊ द्या हो खराब रस्ते, वेळेवर पाणी आणि सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे येथील कचरा परिसरात दुर्गंधी आणि त्या डेपोतील डेपो कधी हलवणार, कचरा डेपोमुळे कचरा हवेबरोबर घराघरांत पसरत असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. याचा बंदोबस्त कधी करणार हा प्रमुख प्रश्न येथील मतदार विचारत असल्याने उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहे.

Muncipal Election
Police Commissioner : कायद्यात राहा अन्यथा भररस्त्यात पोलिसांकडून मिळेल पाहुणचार

जुने, नवखेही हैराण

मतदारांच्या प्रश्नांमुळे जुने म्हणजे यापूर्वी नगरसेवक पद भोगलेले आणि आता नव्यानेच रिंगणात उतरलेले उमेदवार मात्र या प्रश्नांमुळे हैराण झाले आहेत. मतदारांचे मन राखण्यासाठी कचरा डेपोचा बंदोबस्त करू असे आश्वासन देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत असल्याने उमेदवरांत संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news