MP Sandipan Bhumre : विशेष मतदार पुनरीक्षण मोहीम यशस्वी करा

सिल्लोडला शिवसेना पक्षाचे बीएलए, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शन शिबीर
MP Sandipan Bhumre
MP Sandipan Bhumre : विशेष मतदार पुनरीक्षण मोहीम यशस्वी करा file photo
Published on
Updated on

MP Sandipan Bhumre: Make the special voter revision drive a success

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : विशेष मतदार पुनरीक्षण कार्यक्रम हा लोकशाही प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून ही मोहीम यशस्वी करावी, असे खासदार संदीपान भुमरे यांनी सांगितले.

MP Sandipan Bhumre
Voter Verification : घरोघरी जाऊन होणार मतदारांची पडताळणी

विशेष मतदार पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाचे बीएलए पदाधिकारी-कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शन शिबीर व आढावा बैठक शनिवारी सिल्लोड येथील शिवसेना भवनात उत्साहात पार पडली.

बैठकीस खासदार तथा छत्रपती संभाजीनगर-जालना एसआयआर संपर्क प्रमुख संदीपान भुमरे, माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार आणि शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख विलास पारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

MP Sandipan Bhumre
Parbhani News | निवडणूक कर्तव्यात हलगर्जीपणा भोवला ; बीएलओविरुद्ध गुन्हा दाखल

या बैठकीत पात्र मतदारांची अचूक नोंद, बोगस व अपात्र मतदारांची पडताळणी आणि कोणताही पात्र मतदार वंचित राहू नये यासाठी बीएलए यांनी जबाबदारीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

प्रशिक्षण शिबिरात शिवसेना पक्षाचे मार्गदर्शक प्रशांत घोरपडे व दिग्विजय पाटील यांनी एसआयआर कार्यक्रमाची उद्दिष्टे, मतदार पुनरीक्षणाची प्रक्रिया, बीएलए यांची भूमिका, ई-फॉर्म अचूकरीत्या भरण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे, पांढऱ्या पार्श्वभूमीच्या छायाचित्राचे महत्त्व, ओळखपत्र जवळ बाळगणे, तसेच स्थलांतरित, मृत, दुबार व बोगस मतदारांची नोंद याबाबत उदाहरणासह मार्गदर्शन केले.

उपस्थित बीएलए व कार्यकर्त्यांच्या शंका दूर करून प्रत्यक्ष काम अधिक प्रभावीपणे कसे करावे, याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले. या मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीएलए यांचा मुंबई येथे विशेष सन्मान करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

याप्रसंगी नगराध्यक्ष अब्दुल समीर, उपनगराध्यक्ष विठ्ठलराव सपकाळ, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पा. तायडे, जिल्हा परिषद सदस्य देविदास पालोदकर, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन पा. गाढे, बाजार समितीचे सभापती विश्वासराव दाभाडे, उपसभापती संदीप राऊत, संचालक दामूअण्णा गव्हाणे, जयराम चिंचपुरे, सतीश ताठे, राजाराम पाडळे, शेख जावेद, सय्यद नासेर हुसेन, राजू बाबा काळे, देविदास लोखंडे, मुरलीधर काळे, माजी उपसभापती अजिज बागवान, नजीर अहमद, संजय डमाळे, माजी उपनगराध्यक्ष विनोद मंडलेचा, सुखदेव जाधव, राजेंद्र ठोंबरे, धरमसिंग चव्हाण, गोपीचंद जाधव, नगरसेवक शेख इमरान गुड्डू, आसिफ बागवान, नूर मोहम्मद कुरेशी, माजी नगरसेवक प्रशांत शिरसागर तसेच शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, राजश्री निकम, शकुंतलाबाई बन्सोड, मेघा शहा, गीता धाडगे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बूथनिहाय सूक्ष्म नियोजन

आमदार अब्दुल सत्तार यांनी सर्कल प्रमुखांनी बूथनिहाय सूक्ष्म नियोजन करून प्रत्येक बीएलएशी सातत्याने समन्वय ठेवावा आणि एकही पात्र मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news