इथे सिगारेट का पिता? म्हणत अल्पवयीन मुलाने केला ७ ते ८ वेळा चाकू खुपसून खून

Smoking Dispute| मुकुंदवाडीत थरार; हत्या केल्यानंतर आरोपी कॉलर उडवत पसार
Smoking Dispute
घटनास्थळी पाहणी करताना पोलिस अधिकारी
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : घराच्या ओट्यावर बसून सिगारेट ओढण्यास विरोध करत एका १५ वर्षीय अल्पवयीन आरोपीने रोहिदास दत्तू खकाळ (५०) यांच्या पोटात आणि पाठीत सात ते आठ वेळा चाकू खुपसून निघृण हत्या केली. ही घटना मुकुंदवाडी परिसरातील छत्रपतीनगरमध्ये रोहिदास खकाळ बुधवारी (दि.८) रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी खून करून पसार झालेल्या आरोपीला मुकुंदवाडी पोलिसांनी अवघ्या काही तासांत गजानन महाराज मंदिर भागातून बेड्या ठोकल्याची माहिती पोलिस निरीक्षक विवेक सोनवणे यांनी गुरुवारी (दि.९) दिली.

Smoking Dispute
Child swallows glass shards : पालकांनो, सावधान! निष्काळजीपणा जीवावर बेतला...

याबाबत रोहिदास यांच्या पत्नी राणी खकाळ (५०) यांच्या तक्रारीनुसार, त्यांची दोन्ही मुले लग्न झाल्यापासून विभक्त राहतात. तर रोहिदास हे गेल्या आठ वर्षांपासून आजारी असल्याने घरीच राहत होते. राणी या धुणीभांडी करून उदर्निवाह चालवितात. त्या भागातच आरोपी १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा हा कुटुंबासह राहतो.

पोलिसांच्या माहितीनुसार, या भागात नशापाणी करणाऱ्या टोळक्यांचा वावर असतो. रोहिदास खकाळ हे रात्री गल्लीतील मित्रांसोबत घराबाहेर ओट्यावर गप्पा मारत बसत असत. त्यामुळे या टोळक्यांच्या बैठकीला अडचण होत होती. तसेच खकाळ हे ओट्यावर बसून सिगारेट ओढत असल्याने आरोपीला राग येत होता आणि तो नेहमी त्यांना विरोध करत असे. बुधवारी रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास खकाळ दाम्पत्य जेवण करून घरात होते. त्यावेळी दरवाजा ठोठावण्याचा आवाज आल्याने रोहिदास यांनी दरवाजा उघडला. बाहेर उभ्या असलेल्या अल्पवयीन आरोपीने "तुम्ही इथे बसून सिगारेट पीत जाऊ नका, नाही तर तुम्हाला सोडणार नाही," अशी धमकी देत शिवीगाळ सुरू केली. तेव्हा रोहिदास यांनी त्याला तूघरी जा आम्हाला झोपू दे, असे म्हटले. तरीही तो वाद घालू लागला.

घटना सीसीटीव्हीत

केन आरोपी खकाळ यांच्याशी वाद घालत असताना ३ शेजारील दुकानदार शिंदे यांनी मध्यस्थी करत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता संतापलेल्या आरोपीने अचानक ओट्यावर चढून आपल्याजवळील चाकूने रोहिदास यांच्या पाठीत ते ४ वेळा चाकू खुपसला. खकाळ ओट्यावरून खाली पडले तेव्हा पुन्हा आरोपीने त्यांच्या पोटात ३ ते ४ वेळा चाकू भोसकून गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या रोहिदास यांना पाहून पत्नीने हंबरडा फोडला. तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला.

Smoking Dispute
Paithan Wari |आज श्रीसंत एकनाथ महाराज, श्रीसंत भगवान बाबा यांची संत भेट

खुनानंतर कॉलर उडवत निघाला खकाळ यांना भोसकून अल्पवयीन आरोपी

घटनास्थळावरून कॉलर उडवत निघून गेला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले, पोलिस निरीक्षक विवेक सोनवणे, सहाय्यक निरीक्षक हरेश्वर घुगे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपीला रात्री उशिरा गजानन महाराज मंदिर परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक निरीक्षक रोहित गांगुर्डे करीत आहेत.

अल्पवयीन गुन्हेगारीच्या मार्गावर

मुकुंदवाडी परिसरात अनेक गुन्हेगारी टोळ्यांची दहशत आहे. अवैध धंद्यांना ऊत आलेला आहे. स्थानिक पोलिस कारवाया करतात. मात्र गुन्हेगार पुन्हा सक्रिय होऊन गुन्हे करतात. एवढ्यावरच हे न थांबता याच गुन्हेगारांच्या पावलावर पाऊल ठेवून काही अल्पवयीन मुलेही गुन्हेगारी मार्गावर गेल्याचे प्रकार समोर आले आहेत. अल्पवयीन मुलांची खुनापर्यंत मजल गेल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news