Chhatrapati Sambhajinagar Crime : तुझ्यासमोरच हात पकडलाय, काय करशील?' महिलेचा विनयभंग करून पतीवर चाकूहल्ला

टाऊन हॉल परिसरातील प्रकार; बेगमपुरा पोलिसांत मायलेकांवर गुन्हा दाखल
Chhatrapati Sambhajinagar Crime
Chhatrapati Sambhajinagar Crimepudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : दवाखान्यातून पतीसोबत घरी परतणाऱ्या एका विवाहितेचा पाठलाग करत अश्लील हावभाव करून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर पतीने जाब विचारला असता, 'तुझ्यासमोरच तिचा हात पकडलाय, काय करून घेशील?' अशी मुजोरी करत आरोपीने महिलेचा भररस्त्यात हात पकडला. तसेच आरोपीच्या आईनेही महिलेवर चाकूहल्ला करत दुखापत केली. ही घटना शनिवारी (दि.२०) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास टाऊन हॉल, लाल मशिदीसमोर घडली. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात मायलेकांवर विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुजाहेद आलम मुख्तार आलम आणि त्याची आई शमीम बेगम (दोघे रा. आसेफिया कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत फिर्यादी महिला आणि तिचे पती २० जून रोजी दुपारी दवाखान्यातून अॅक्टिव्हावरून घरी जात होते. त्यावेळी आरोपी मुजाहेद हा त्यांच्या मागे येत होता. त्याने महिलेला पाहून अश्लील हावभाव करून इशारा केला. सुरुवातीला महिलेने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, आरोपीने पुन्हा 'शुक शुक' असा आवाज करत इशारा केला.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Mahesh Landge : सहिष्णुता, नम्रता, शांतता आम्हीच बाळगायची का?

या सततच्या त्रासामुळे महिलेने हा प्रकार आपल्या पतीला सांगितला. पतीने तात्काळ गाडी बाजूला उभी केली आणि आरोपीला थांबवून 'माझ्या पत्नीला कशाला इशारा करू लागला?' असा जाब विचारला. त्यावर आरोपी मुजाहेद याने मग्रुरीने 'तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिले का?' असा सवाल केला. 'नाही पाहिले असेल तर आता मी तुमच्यासमोर तिचा हात धरतो' असे म्हणत वाईट हेतूने आरोपीने महिलेचा डावा हात पकडला आणि 'ये लो अभी आपके सामने हात पकडा, क्या कर लेंगे तुम ?' असे आव्हान दिले.

आईचा चाकूने वार; मध्यस्थालाही दुखापत

या मुजोर प्रकारानंतर महिलेने आरोपीच्या आईला (शमीम बेगम) विचारले की, 'तुम्ही तुमच्या मुलाला हेच शिकवले का?' याचा राग आल्याने शमीम बेगम हिने चाकूने महिलेच्या डाव्या दंडावर वार केला. यावेळी पती भांडण सोडवण्यासाठी मध्ये आला असता, त्यालाही मायलेकांनी मारहाण केली. आरोपी मुजाहेद याने मोठा चाकू काढून फिर्यादीच्या पतीला मारण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेले शेख अजीज हे मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले. त्यांनी आरोपीचा चाकू पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या डाव्या हाताला दुखापत होऊन रक्तस्राव झाला. गुन्ह्याचा पुढील तपास अंमलदार सोनवणे करत आहेत.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Nanded love affair murder | नांदेडात प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या; प्रेयसीने केले मृतदेहाशी लग्न!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news