

छत्रपती संभाजीनगर : गेल्या दोन दिवसांपासून पावसाने राज्यात हाहाकार केला आहे. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली आहे. तर कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यात 14 लाख हेक्टरवरील शेती बाधित झाल्याचे सांगितले. दरम्यान, एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके अलर्टवर आहेत. पावसामुळे राज्यात 12 जणांचे बळी गेले आहेत. त्यापैकी 9 बळी एकट्या नांदेड जिल्ह्यातील आहेत.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे 12 ते 14 लाख एकरावरील शेती बाधित झाली आहे. सर्वच ठिकाणची परिस्थिती नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्य शासनाच्या वतीने एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे. बहुतांश नद्या या इशारा पातळीवर आहेत. तर, काहीच नद्या या इशारा पातळीच्या वर वाहत आहेत. शेजारील राज्यांसोबत उत्तम समन्वय साधला जात आहे. त्यामुळे पाण्याच्या विसर्गासाठी चांगल्या पद्धतीने समन्वय सुरू आहे. शेजारी राज्यही आवश्यक विसर्ग करत आहेत. विशेषतः हिप्परगीची चिंता असून त्यांनी विसर्ग सुरू केला असून तो त्यांनी आणखी वाढवावा यासाठी बोलणी सुरू आहेत. तेलंगणा राज्यासोबतही आपण संपर्क करत आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ज्या ठिकाणी जनावरांचे नुकसान झाले आहे, घरांचे नुकसान झाले आहे किंवा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे त्या संदर्भातले मदतीचे अधिकार जिल्हाधिकार्यांना दिलेले आहेत. एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे जिल्हाधिकारी त्यांना तत्काळ मदत करू शकतात. त्यांना थेट पैसे देण्याचेही अधिकार दिलेले आहे. त्यामुळे तिथे अडचण येणार नाही. शेती संदर्भात देखील पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मराठवाड्यात 48 तासांत 813 टक्के प
नांदेड : जिल्ह्यातील ‘लेंडी धरण-अनेकांना मरण’ अशा दारुण स्थितीचा अनुभव घेणार्या हसनाळ (ता. मुखेड) येथील अबाल-वृद्धांचा प्रशासनावरील तीव्र संताप मंगळवारी दिवसभरात समोर आल्यानंतर तेथील कोंडी दूर करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळातील संकटमोचक व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांना सायंकाळी मुंबईहून नांदेडला व येथून तातडीने हसनाळच्या बाधितांकडे धाव घ्यावी लागली. यावेळी त्यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेतला.
मुखेड तालुक्याच्या काही गावांमध्ये आपत्ती निवारणात महसूल व इतर वेगवेगळ्या यंत्रणा सोमवारपासूनच कार्यरत झाल्या. जिल्हा प्रशासनाच्या विनंतीवरून छत्रपती संभाजीनगर येथून लष्कराची 65 जणांची एक तुकडी हसनाळ व इतर गावांमध्ये पोहोचली. हसनाळमधील मदत कार्याला मंगळवारी गती आली. बाधितांच्या भोजनाची तसेच आवश्यक त्यांना वैद्यकीय उपचारांची व्यवस्थाही लष्करी पथकाकडून सुरू झाली. एकंदर परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.