

पिशोर: कन्नड तालुक्यातील पिशोर येथील बाजार पट्टीला लागून असलेल्या अंजना नदीवरील रामेश्वर वस्ती रस्त्याला जोडणाऱ्या पुलावरून सोमवारी (दि.२९) श्रावण निवृत्ती मोकासे हा दहा वर्षीय बालक वाहून गेला होता. NDRF टीमकडून त्याचा शोध सुरू असून, मुलाचा अद्याप शोध लागला नसल्याचे समोर आले आहे.
श्रावण मोकासे हा रामेश्वर वस्ती रस्त्याला जोडणाऱ्या पुलाजवळ शेताच्या कडेने जात असताना त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला होता. स्थानिक तरुणांनी सोमवारी शोध घेतला होता परंतु, सर्व प्रयत्न निष्फळ ठरले होते. रात्री उशिरा तहसीलदार विद्याचरण कवडकर यांनी घटनास्थळी भेट दिली. मंगळवारी (दि.३० सप्टें.) 'एनडीआरएफ'च्या (NDRF) एकोणीस जणांच्या पथकाने महेंद्रसिंग पुनिया यांच्या नेतृत्वाखाली तीन किलोमीटर पर्यंत नदी पात्रात शोध घेतला. संध्याकाळी उशिरायर्यंत त्याचा शोध लागला नव्हता.
दरम्यान उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, सहायक पोलीस अधीक्षक परी.अपरिचिता अग्निहोत्री, तहसीलदार विद्याचरण कडवकर, आमदार संजनाताई जाधव, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार हर्षवर्धन जाधव, उदयसिंग राजपूत, पिशोर पोलीस ठाण्याचे सपोनि शिवाजीराव नागवे यांनी भेट देऊन परिस्थिती चा आढावा घेतला. बुधवारी (दि.1ऑक्टो.) पुन्हा एकदा NDRFचे पथक शोध मोहीम राबविणार असल्याचे पथक प्रमुख पुनिया यांनी सांगितले.