

सुनील कच्छवे
छत्रपती संभाजीनगर : गतवर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात लाखो हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले. त्यामुळे राज्य सरकारने मराठवाड्यातील नुकसानग््रास्त शेतकर्यांसाठी तब्बल 8 हजार 701 कोटी रुपयांचा मदत निधी मंजूर केला. मात्र आता सहा महिने उलटले तरी केवळ 77 टक्केच मदतीचे वाटप होऊ शकले आहे.
मराठवाड्यातील तब्बल 14 लाख 22 हजार लाभार्थींची सुमारे दोन हजार कोटी रुपयांची मदत अजूनही थांबली आहे. महसुली यंत्रणेच्या दप्तरदिरंगाईमुळे हा निधी वितरित होणे थांबल्याचे दिसून येत आहे.
मराठवाड्यात जुलै ते सप्टेंबर 2025 या कालावधीत जवळपास सर्वच महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. पूर आणि अतिवृष्टीमुळे सर्व शेती पिके नष्ट होऊन शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले. राज्यातील इतर काही भागांतही अशाच पद्धतीने शेतीपिकांचे नुकसान झाले. त्यामुळे राज्य सरकारने राज्यभरातील अतिवृष्टीग््रास्त शेतकर्यांसाठी तब्बल
बँक खात्यावर अनुदान जमा झालेले लाभार्थी
छत्रपती संभाजीनगर- 10 लाख 31 हजार 294
जालना - 9 लाख 24 हजार 463
परभणी - 10 लाख 62 हजार 419
हिंगोली- 6 लाख 58 हजार 630
नांदेड - 14 लाख 15 हजार 948
बीड - 16 लाख 79 हजार 464
लातूर -13 लाख 78 हजार 838
धाराशिव - 10 लाख 71 हजार 374
एकूण - 92 लाख 22 हजार 430
छत्रपती संभाजीनगर - 13 लाख 79 हजार 552
जालना- 12 लाख 51 हजार 39
परभणी -11 लाख 56 हजार 576
हिंगोली- 7 लाख 29 हजार 872
नांदेड- 17 लाख 34 हजार 154
बीड - 17 लाख 40 हजार 539
लातूर -14 लाख 1 हजार 793
धाराशिव - 12 लाख 51 हजार 478
एकूण - 1 कोटी 6 लाख 45 हजार 3