

छत्रपती संभाजीनगर :महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत खुची न दिल्यामुळे मंत्री अतुल सावे आणि आमदार संजय केणेकर यांच्यात नार-ाजीनाट्य रंगले. यावेळी सावे यांनी खा. भागवत कराड यांना उद्देशून आमदार संजय केणेकर यांच्यावर निशाणा साधला. तुमच्यासाठी लोक खुर्च्छा सोडतात, मी बसतो इकडे असे म्हणत त्यांनी केणेकरांविषयी उघड नाराजी व्यक्त केली. तर दुसऱ्या एका कार्यक्रमात भाजपचे माजी महापौर बापू घडामोडे यांनीही कोपर्यात खुची दिल्यामुळे त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.
शहरातील एका हॉटेलात शनिवारी महायुतीच्या जागावाटपाची बैठक पार पडली. बैठक संपल्यावर सर्व माध्यम प्रतिनिधी हॉलमध्ये शिरले. तोपर्यंत मंत्री अतुल सावे बाजूच्या हॉलमध्ये गेले होते. ते येईपर्यंत पालकमंत्री संजय शिरसाट आणि इतर पदाधिकारी थांबले. सावे येईपर्यंत शिरसाट यांच्या एका बाजूला केणेकर आणि किशोर शितोळे तर दुसऱ्या बाजूला राजेंद्र जंजाळ बसले होते.
काही क्षणात सावे आणि खा. कराड हे दोघे तिथे आले तेव्हा खुची रिकामी नव्हती. त्यामुळे सावे उभे राहिले. लगेचच केणेकर यांनी कराड यांच्यासाठी खुची रिकामी केली. तेव्हा कराड यांनी मंत्री सावे यांना तिथे बसण्याचा आग्रह धरला. परंतु सावे यांनी तुम्ही बसा, तुमच्यासाठी लोक खुर्चा रिकाम्या करतात, असे म्हणत नाराजी व्यक्त केली. त्यावर केणेकर यांनी साहेब मी तुम्हाला बघितल्यावर लगेचच उठलो होतो, असा खुलासा केला. तोपर्यंत दुसऱ्या बाजूला बसलेल्या जंजाळ यांनीही बाजूच्या खुचीवर बसत आपली खुची रिकामी केली. मग सावे हे जंजाळ यांच्या खुचीवर जाऊन बसले. सावे आणि केणेकर यांच्यातील संवादामुळे तणाव निर्माण झाल्याचे लक्षात येताच किशोर शितोळे मध्यस्थी करत विषय संपविला.
भाजप कार्यालयात घडामोडेंना कोपऱ्यात जागा
शिवसेना उबाठा पक्षाचे माजी नगरसेवक मनोज गांगवे यांनी दुपारी भाजपात प्रवेश केला. भाजपच्या विभागीय कार्यालयात हा सोहळा पार पडला. तिथे माजी महापौर बापू घडामोडे यांना एका कोपर्यातील खुचीवर बसावे लागले. भाषणात मंत्री सावे यांनी घडामोडे यांचे नाव घेत ते कुठे आहेत याची विचारणा केली. त्यावर घडामोडे यांनी मी इकडे कोपर्यंत आहेत, नशीब मला इथे कोपऱ्यात तरी बसू दिले, असे म्हणत नाराजी व्यक्त केली.