

पैठण : पैठण विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार रेणुकादेवी शरद साखर कारखान्याचे चेअरमन विलास भुमरे हे घरातील गॅलरीत आज (दि.११) चक्कर येऊन कोसळल्याने जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या पायाला दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गर्दी करू नये, व मतदार संघातील प्रचार कार्य सुरू ठेवावे, असे आवाहन खासदार संदिपान भुमरे यांनी केले आहे. तसेच विलास भुमरे यांची प्रकृती ठीक असून रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर ते आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतील, असे पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे यांनी सांगितले.