

वैजापूर : पैशांचा पाऊस पाडतो म्हणून आठ जणांना सहा लाख पन्नास रुपयांना गंडविल्या प्रकरणी दोन जणांविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेणूनाथ कचरू त्रिभुवन, सचिन शिवाजी ( दोघेही रा.कापूसवाडगाव) अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील चौघांना तर वैजापूर येथील चौघांना या दोन्ही आरोपींनी मागिल काळात "आम्ही तुमच्या घरी पैशांचा पाऊस पडतो" त्यासाठी विविध धार्मिक विधी कराव्या लागेल , यासाठी लाखोंचा खर्च येतो असे अमिष दाखवून टप्प्याटप्प्याने अनेक महिन्यांमध्ये साडेसहा लाखांना गंडवले. हे सर्व आठ जण नातेवाईक असल्याने एकमेकांवर विश्वास ठेवत हा सर्व विधी करत गेले. अखेर त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी वीरगाव पोलीस ठाणे गाठत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. अधिक तपास वीरगाव पोलीस करत आहे.
नेहमीप्रमाणे फसवणूक झालेल्या व्यक्तींनी आरोपींशी संपर्क केला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. काही दिवसांनी प्रतिसाद दिल्याने आरोपींनी उडवा उडवीचे उत्तर देण्यास सुरुवात केल्याने लक्ष्मी रमेश अस्वले रा. (छत्रपती संभाजीनगर शहर) यांनी गाठले व वीरगाव पोलीस गुन्हा दाखल केला.