Solar Lamp Project Fraud : सोलर लॅम्प प्रोजेक्टचे आमिष; मजुराला ३ लाखांचा गंडा

बनावट संस्थाध्यक्षाकडून फसवणूक आणि मारहाण
Fraud News
Solar Lamp Project Fraud : सोलर लॅम्प प्रोजेक्टचे आमिष; मजुराला ३ लाखांचा गंडाFile Photo
Published on
Updated on

Lured by Solar Lamp Project; Laborer Swindled Out of ₹3 Lakhs

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील एका मजुराला सोलर लॅम्प प्रोजेक्टचे आमिष दाखवून तब्बल तीन लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. युवा संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नावाचे बोगस कार्यालय थाटून ही फसवणूक करण्यात आली असून, पैसे परत मागितल्यावर संस्थाध्यक्षाने थेट जिवे मारण्याची धमकी देत मारहाण केली. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात सचिन रामराव राठोड या भामट्या अध्यक्षाविरुद्ध मंगळवारी (दि.२६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Fraud News
Fraud Case : कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक; तरुणाने घेतला गळफास

फिर्यादी ज्ञानेश्वर आत्माराम साळवे (५३, रा. हरी कॉलनी, ता. मंठा, जि. जालना) यांच्या तक्रारीनुसार, ते मजुरी आणि सामाजिक काम करतात. मार्च २०२३ मध्ये साळवे आणि त्यांचे सहकारी महेश धुमाळ व गणेश जाधव यांनी कामगार चौक, सिडको येथील केतकी हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या राठोडच्या संस्थेच्या कार्यालयात भेट दिली होती.

जालना जिल्ह्यासाठी सोलर लॅम्पचा प्रोजेक्ट मिळवून देण्याचे सचिन राठोडने त्यांना आमिष दाखवले. या प्रोजेक्टसाठी तीन लाख रुपये अनामत रक्कम भरावी लागेल, असे त्याने सांगितले. साळवे यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून मार्च २०२३ मध्ये दोन लाख रुपये रोख आणि १ नोव्हेंबर २०२३ रोजी एक लाख रुपये आरटीजीएसद्वारे राठोडला दिले.

Fraud News
वेअरहाऊस उभारताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून ७७ लाखांची फसवणूक

रातोरात कार्यालय गायब

पैसे दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी राठोडने त्यांना बोलावले होते. मात्र साळवे व त्यांचे मित्र कार्यालयात पोहोचले असता तिथे युवा संकल्प नावाची कोणतीही संस्था नव्हती. घरमालकाकडे चौकशी केली असता, संस्था किरायाचे पैसे न देताच आणि कोणालाही न सांगता रातोरात पळून गेल्याचे समोर आले. राठोडचा मोबाईलही बंद येत होता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news