Eye Injury : चिमुकलीच्या डोळ्याला पेन्सिलमुळे गंभीर इजा

घाटीने वाचवली दृष्टी
Eye Injury
Eye Injury : चिमुकलीच्या डोळ्याला पेन्सिलमुळे गंभीर इजाfile photo
Published on
Updated on

Little girl suffers serious eye injury from a pencil

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा खेळताना डोळ्यात पेन्सिलचा टोक घुसल्याने कॉर्नियाला (बाहय-नेत्रपटल) गंभीर दुखापत झालेल्या एका चार वर्षीय चिमुकलीची दृष्टी घाटीने वाचवली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नेत्र विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी तातडीने यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यामुळे या चिमुकलीची दृष्टी वाचवता आली आहे. विशेष म्हणजे, खाजगीत या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी लाखभर खर्च सांगितला असताना घाटीत मात्र, निशुल्क उपचार मिळाले.

Eye Injury
Digital Arrest : डिजिटल अरेस्ट करण्याची भीती दाखवून प्राध्यापकाची ५१ लाखांची फसवणूक

फुलंब्री तालुक्यातील सर्वसामान्य कुटूंबातील ही चिमुकली खेळत असताना तीच्या डाव्या डोळ्यात पेन्सिलचा टोक घुसला. डोळा उघडता येत नसल्याचे बघून कुटूंबियांनी तीला छत्रपती संभाजीनगर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, शस्त्रक्रियेची गुंतागुंत आणि संभाव्य खर्च लक्षात घेऊन पुढील उपचारांसाठी तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) संदर्भित करण्यात आले.

येथील नेत्रशल्य चिकित्सा शास्त्र विभागाने रुग्णाची सखोल तपासणी करून तातडीने शस्त्रक्रियेचे नियोजन केले. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख डॉ. अर्चना वरे यांच्या नेतृत्वात डॉ. महेश सोनपेठकर, डॉ. वेणुगोपाल रांगू आणि डॉ. तपन जक्कल यांनी अत्यंत कौशल्याने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. विभागातील वरिष्ठ निवासी डॉ मोहन मोरखडे, डॉ इमाद ख्वाजा आणि डॉ मधुश्री, डॉ सोनिया, डॉ साक्षी, डॉ शीतल, डॉ अनुष्का यांचे सहकार्य लाभले.

Eye Injury
Nanded Police Raid : नरसी येथील दोन लॉजवर पोलिसांचा एकाचवेळी छापा

शस्त्रक्रियेदरम्यान बधिरीकरणशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. गायत्री तडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बधिरीकरणतज्ज्ञांच्या सहायक प्राध्यापक डॉ प्रेरणा शिंदे व त्यांच्या पथकाने व इतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. चिमुकलीची प्रकृती समाधानकारक असून तिची दृष्टी सुरक्षित ठेवण्यात यश आले आहे. या यशस्वी उपचाराबद्दल मुलीचे आई-वडील आणि नातेवाईकांनी आभार मानले.

पालकांनो, लहान मुलांकडे लक्ष द्या !

पालकांनी लहान मुलांना पेन्सिल, पेन, कात्री किंवा इतर टोकदार वस्तू हाताळताना योग्य देखरेखीखाली ठेवावे. असे आवाहन डॉक्टरांनी केले. डोळ्याला कोणतीही दुखापत झाल्यास वेळ न दवडता त्वरित नेत्रतज्ज्ञांकडे उपचार घ्यावेत. योग्य वेळी उपचार मिळाल्यास गंभीर दुखापतीतही दृष्टी वाचविणे शक्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news