पती संशय घेत असल्याने डॉक्टर तरुणीने संपवले जीवन

राहत्या घरी गळफास घेवून संपवले जीवन
Doctor ended her life as her husband became suspicious
पती संशय घेत असल्याने डॉक्टर तरुणीने संपवले जीवनPudhari File Photo
Published on
Updated on

पती संशय घेत असल्याने हैराण झालेल्या डॉक्टर महिलेने शनिवारी(दि.24) गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. या घटनेची नोंद सिडको पोलिसांनी घेतली आहे. प्रतिक्षा प्रितम गवारे उर्फ प्रतिक्षा प्रकाश भुसारे (वय. 26 रा.टेलीकॅाम हाऊसींग सोसायटी बजरंग चौक) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

Doctor ended her life as her husband became suspicious
ह्रदयद्रावक... मातेच्या निधनानंतर संपत्ती दान करून भावा-बहिणीने जीवन संपवले

मिळालेल्या माहितीनुसार, प्रितम आणि प्रतिक्षाचे सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. प्रितम हा प्रतिक्षाला हुंडा, फर्निचरसाठी त्रास देत होता. तसेच तिच्यावर संशय देखील घ्यायचा. त्यामुळे दोघांचे नेहमी वाद होत होते. प्रतिक्षा सध्या वडिलांकडे राहत होती. तर प्रितम रामनगर येथे राहत होता. दोघेही शहरात स्थलांतरीत होणार होते. त्यामुळे, बजरंग चौक येथील टेलीकॅाम हाऊसींग सोसायटीमध्ये त्यांनी रेन्टने प्लॅट घेतला होता. तिथे राहण्यासाठी येणार होते.

Doctor ended her life as her husband became suspicious
ह्रदयद्रावक... मातेच्या निधनानंतर संपत्ती दान करून भावा-बहिणीने जीवन संपवले

प्रतिक्षाल एमजीएम रुग्णालयात नोकरी मिळाली होती. तीची सध्या ट्रेनिंग सुरू होती. प्रितम रामनगर येथून शनिवारी (दि.24)त्यांच्या प्लॅटवर आला. प्रतिक्षा एमजीएममध्ये होती . यावेळी प्रतिक्षाला प्रितमने दुपारी प्लॅटवर १.३० च्या सुमारास बोलावून घेतले. यानंतर प्रतिक्षाने गळफास जीवन संपवले. या प्रकरणी सिडको पोलिस तपास करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news