Kumbh Mela 2025 : नाशिक कुंभमेळ्यासाठी छत्रपती संभाजीनगरचाही आठशे कोटींचा प्रस्ताव
छत्रपती संभाजीनगर : नाशिक येथे जानेवारी-फेब्रुवारी २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या कुंभमेळ्यानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात रस्ते विकास, पूल बांधणी, वाहतूक व्यवस्थेचे नियोजन यासह विविध सुविधांचा विकास करावा लागणार आहे. त्यासाठी सुमारे आठशे कोटी रुपयांच्या निधीची मागणी करणारा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे सादर केला जाणार आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही भाविकांची सन २०२७ च्या सुरुवातीला नाशिक त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाने पायाभूत सुविधांची तयारी वेगाने सुरू झाली आहे.
कुंभमेळा काळात नाशिकसोबतच लगतच्या मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहराच्या अंतर्गत आणि बाह्य रस्त्यांचा विकास, नवीन रस्ते व पूल बांधणी, वाहतूक व्यवस्थेचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
शासनाने नाशिकला पहिल्या टप्प्यात ५ हजार कोटींचा निधी मंजूर केला असून, यात रस्ते, पायाभूत सुविधा आणि शहरातील इतर विकासकामांचा समावेश आहे. याच धर्तीवर वेरूळ घृष्णेश्वर मंदिर, जिल्ह्यातून नाशिककडे जाणाऱ्या मार्गांचा विकास आदी कामांसाठी शासनाकडे निधी मागण्यात येणार आहे. या अनुषंगाने लवकरच सर्व शासकीय विभागांची एक बैठक होणार असल्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात, शहरात विविध कामे करावी लागणार आहेत. त्याबाबत लवकरच शासकीय यंत्रणांची बैठक घेण्यात येणार आहे. शासनाकडे सुमारे आठशे कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव पाठविला जाईल.
दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी

