Sambhajinagar News : कन्नडला पाणी बाटलीच्या दरावरून तुफान हाणामारी

परस्परविरोधी तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा दाखल
Sambhajinagar Crime News
Sambhajinagar News : कन्नडला पाणी बाटलीच्या दरावरून तुफान हाणामारीpudhari photo
Published on
Updated on

Kannada: Clashes erupt over water bottle price

कन्नड, पुढारी वृत्तसेवा : शहरातील हिवरखेडा रोडवरील पांडवनगरीजवळ सायंकाळी पाणी बाटलीच्या किमतीवरून दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. किरकोळ वादाचे पर्यावसान गंभीर मारामारीत झाले असून, या घटनेत दोन्ही बाजूंचे अनेक जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Sambhajinagar Crime News
Beed Crime | नांदुरघाट येथे पोलिसांची कारवाई : अवैधरित्या गोवंशीय प्राण्यांची वाहतूक करणारा टेम्पो पकडला

पांडवनगरी येथील राज सुभान शेख (३०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या वडिलांच्या पानटपरीवर मेहताबनगर येथील इम्रान शेख व गॅस गोडाऊन परिसरातील मुजाहिद शेख युनूस ऊर्फ मुजुडॉन हे पाण्याची बाटली घेण्यासाठी आले होते. बाटलीच्या किमतीवरून वाद झाल्यानंतर दोघांनी टपरी चालकाला शिवीगाळ केली. त्यानंतर काही वेळाने ते कन्नड येथील सलमान बाटुक व मोईन गणी सायकलवाले यांना सोबत घेऊन पुन्हा टपरीवर आले. त्यांनी राज शेख, त्यांचे वडील सुभान शेख व भाऊ बबलू शेख यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

यादरम्यान मुजाहिद याने लोखंडी पट्टीने राज शेख यांच्या डोक्यात वार करून गंभीर जखमी केले, तर मोईन गणी सायकलवाले याने सुभान शेख यांच्या डोक्यात लोखंडी पट्टी मारून जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Sambhajinagar Crime News
Jalna Crime | जाफराबादमध्ये बुलेट चोरट्यांचा पाठलाग जीवावर बेतला; मिरची व्यापारी शेख मोहसीन यांचा निर्घृण खून, पुतण्या गंभीर जखमी

दुसऱ्या बाजूने, समर्थनगर येथील मोईन गणी शेख (३९) यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, ते हिवरखेडा रोडवरील पांडवनगरीजवळील टपरीवर पाण्याची बाटली घेण्यासाठी गेले असता बाटलीच्या किमतीवरून वाद झाला. त्यावेळी पांडवनगरी येथील सुभान शेख यांनी थेट हातोडीने डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले.

कन्या शाळेजवळील बॉम्बे बिल्डिंग परिसरातील सलमान व अन्सार शेख, तसेच पांडवनगरी येथील रियाज सुभान शेख यांनी आपल्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप मोईन शेख यांनी तक्रारीत केला आहे. दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news