छ.संभाजीनगर : कमळापूरच्या बिल्डरचा मध्यप्रदेशात खून

बिंजलवाडा जंगलात आढळला अर्धवट जळालेला मृतदेह
Kamlapur builder murder case
कमळापूरच्या बिल्डरचा मध्यप्रदेशात खून झाला.
Published on
Updated on

वाळूज महानगर : वाळूज महानगरातील कमळापूर येथील एका बांधकाम व्यावसायिकाचा मध्यप्रदेशात निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ते १७ सप्टेंबरला १० लाख रुपये घेऊन चालकासोबत घराबाहेर पडले होते. त्यानंतर २८ सप्टेंबरपासून त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. मंगळवारी (दि.९) बिंजलवाडा जंगलात त्यांचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. किशोर बाबूराव लोहकरे (४०, रा. कमळापूर, ता. गंगापूर) असे या मृत व्यावसायिकाचे नाव आहे.

Kamlapur builder murder case
अहिल्यानगर हादरले: २ भावजयांचा कोयत्याने वार करून निर्घृण खून, दीर फरार

अधिक माहितीनुसार, किशोर लोहकरे हे पत्नी, दोन मुलांसह कमळापूर येथे वास्तव्यास होते. तीन आठवड्यांपूर्वी १७ सप्टेंबरला ते मुंबईला जात असल्याचे पत्नीला सांगून १० लाख रुपये घेऊन घराबाहेर पडले होते. चालक जावेद सत्तार शेख (रा. कमळापूर) हाही त्यांच्यासोबत होता. १९ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास चालक जावेद घरी परतला. सोबत नेलेले १० लाख रुपये त्याने किशोर यांच्या पत्नीकडे दिले आणि किशोर हे मुंबईला थांबले आहेत, असे सांगितले. त्यानंतर कार घरासमोर लावून तो निघून गेला.

२६ सप्टेंबरला किशोर यांनी पत्नीला फोन केला. इंदूरला जात असल्याचे सांगून त्यांनी जावेदजवळ पुन्हा १० लाख रुपये दे आणि त्याला इंदूरला पाठव, असा निरोप दिला. त्यांच्या पत्नीने पुन्हा जावेदकडे दहा लाख रुपये दिले आणि इंदूरला पाठविले. दरम्यान, जावेद याने पैसे दिल्याचे किशोर यांनी पत्नीला सांगितले. तसेच कामानिमित्त कोलकाता येथे जात असल्याचे कळविले होते. २७ सप्टेंबरला जावेद हा कार घेऊन पुन्हा घरी परतला. २८ सप्टेंबरला पत्नीने किशोर यांच्या मोबाईलवर फोन केला. मात्र त्यांनी फोन उचलला नाही. त्यांनी अनेकदा फोन केला मात्र संपर्क होऊ शकला नाही. शेवटी, किशोर यांचा मोबाईल बंद झाला. पतीशी संपर्क न झाल्यामुळे घाबरलेली पत्नी आशा लोहकरे यांनी ३ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात पती किशोर लोहकरे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.

कपडे आणि अंगठीमुळे पटली ओळख

बांधकाम व्यावसायिक बेपत्ता असल्याचे समोर आल्यावर वाळूज एमआयडीसी पोलिसांनी युद्धपातळीवर शोधमोहीम हाती घेतली. त्यांनी मध्य प्रदेश पोलिसांशी संपर्क साधला. तांत्रिक तपास केल्यावर मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यात शेवटचे लोकेशन आढळले. त्यानंतर अधिक तपास करून खरगोन जिल्ह्यातील बिंजलवाडा शिवारातील घनदाट जंगलात पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. त्यानंतर बुुधवारी (दि.९) सकाळी अर्धवट जळालेला एक मृतदेह आढळला. मृतदेहाच्या बाजूला असलेले कपडे, त्यांच्या अंगावरील खुना, हाताला बांधलेला दोरा आणि अंगठीवरून नातेवाइकांनी मृतदेहाची ओळख पटविली.

पैसे पचविण्यासाठी काटा काढल्याचा संशय

एमआयडीसी वाळूज ठाण्याचे निरिक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गिते, जमादार विनोद नितनवरे, पोलीस अंमलदार हनुमान ठोके, महेंद्र साळुंके यांच्या पथकाने मध्यप्रेदश गाठले. तेथे तपास करून बिल्डर किशोर लोहकरे यांचा मृतदेह शोधून काढला. त्यांचा खून नेमका कोणी आणि कशासाठी केला, याबाबत उलट-सुलट चर्चा आहेत. शेख जावेदनेच पैसे पचविण्यासाठी हा खून घडवून आणल्याचा दाट संशय आहे.

चार आरोपींची नावे निष्पन्न

मध्यप्रदेश पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत. एमआयडीसी वाळूज पोलिसही त्यांच्या मदतीला आहेत. संशयाची सुई जावेदवर असून त्याला मध्यप्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यासह तुळशीराम रुपचंद सोलंकी, मुकेश तुळशीराम सोलंकी (दोघे रा. तोरणे, जि. खंडवा), कमलेश काळूराम पाटीदार (रा. थंब गुराडिया, जि. रतलाम) या तिघांची नावे निष्पन्न झाली आहेत. किशोर लोहकरे यांचा चालक शेख जावेद शेख सत्तार याला हाताशी धरून त्यांनी हा गुन्हा केल्याचा संशय आहे.

Kamlapur builder murder case
मुरगूडमध्ये शिक्षकाकडून शिक्षिका पत्नीचा डोक्यात वरवंटा घालून खून

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news