जालना महामार्गावर गॅस पाईपलाईन फुटून आगीचे तांडव

सर्वत्र या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले. झोपेतून जागे झालेले नागरिक अग्नितांडव पाहून भयभीत झाले होते
जालना महामार्गावर गॅस पाईपलाईन फुटून आगीचे तांडव
Published on
Updated on

करमाड : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडगाव येथील जालना महामार्गावर गुरुवारी (दि. २३) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास भारत पेट्रोलियमची गॅस पाईपलाईन फुटल्याने मोठी आग लागली. ही पाईपलाईन डीएमआयसी क्षेत्राला गॅस पुरवठा करते. पाईपलाईनमधील अतिप्रेशरमुळे आगीचे लोळ तब्बल २० फुटांपर्यंत उंच जात होते, ज्यामुळे परिसरातील विद्युत तारा गरम होऊन तुटून पडल्या. परिसरातील वीज खंडित झाली. सर्वत्र या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले. झोपेतून जागे झालेले नागरिक अग्नितांडव पाहून भयभीत झाले होते.

"पाईपलाईनवर असलेला कचरा कोणीतरी जाळल्यामुळे किंवा अनावधानाने लागलेल्या आगीमुळे ही दुर्घटना घडली असावी, असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. ज्या ठिकाणी आग लागली, तिथल्या चेंबरच्या झाकणातून उष्णता खाली पोहोचल्याने पाईपलाईनला किरकोळ गळती (लीकेज) झाली असावी. मात्र लाडगावकरांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. घरगुती वापरासाठीचा (स्वयंपाकाचा) गॅस पुरवठा पूर्णपणे सुरक्षित आहे."

- मनोज जाधव (बिझनेस हेड)

तरुणांच्या तत्परतेने टळला अनर्थ

पहाटेच्या शांततेत अचानक आगीचे रौद्र रूप पाहून लाडगाव येथील तरुणांनी तातडीने हालचाल केली. त्यांनी भारत पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून गॅस पुरवठा बंद करण्याची सूचना केली आणि अग्निशमन दलाला पाचारण केले. एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या एका बंबाने शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने वेळीच पुरवठा बंद झाल्याने मोठा स्फोट किंवा जीवितहानी टळली आहे.

घरोघरी असलेल्या पाईपलाईनमुळे भीती

लाडगाव परिसरात सध्या घरोघरी पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा केला जातो. ज्या पंपावरून पश्चिमेला गावासाठी आणि पूर्वेला एमआयडीसीसाठी पुरवठा होतो, तिथेच हा बिघाड झाल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सध्या एमआयडीसीकडे जाणारा पुरवठा खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आला असून, दुरुस्तीचे काम सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news