financial fraud scam arrest | कंपनी बदलली, फसवणुकीचा धंदा तोच; फरार ठग जाळ्यात

Jalna financial fraud scam arrest- जालन्यात सेमिनारमधूनच सिडको पोलिसांची अटक; 'दिशा'नंतर 'व्हिजन'च्या नावाने फसवणूक
  Crime News
Crime News pudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर - मल्टी लेव्हल मार्केटिंग (एमएलएम) योजनेद्वारे आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची आरोपी श्याम कवडे गुन्ह्यात मागील तीन 'डायमंड' बनून जालना येथील एका हॉटेलमध्ये प्रथम प्रशिक्षण व दिवाळी सेलिब्रेशन कार्यक्रम आयोजित करणाऱ्या या दोन्ही ठगांना सिडको पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या.

श्याम साहेबराव कवडे (३५, रा. गायगव्हाण, ता. घनसावंगी, जि. जालना) आणि संतराम जनार्दन कणके (५४, रा. भांबेरी, ता. अंबड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघांना होते. न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी मंगळवारी (दि. २७) दिली. अधिक माहितीनुसार, सन २०१८ मध्ये फसवणूक केल्याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात दाखल वर्षांपासून फरार असलेले दोन मुख्य आरोपी जालन्यात चक्क नवीन कंपनीचा सेमिनार घेताना पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.

स्वतः सी.एम.डी. आणि आरोपी श्याम कवडे आणि संतराम कणके यांनी कंपनीचे संचालक संजय दुसाणे व मीरा दुसाणे यांच्यासोबत मिळून दिशा टोटल मार्केटिंग सोल्युशन प्रा. लि. या कंपनीची चेन-मार्केटिंग योजना सुरू केली होती. या योजनेत सुरुवातीला ८ हजार ४९९ रुपये भरून नोंदणी करणे आणि त्यानंतर सलग ५२ आठवडे दर आठवड्याला १ हजार रुपयांचे रिपर्चेस केल्यास प्रत्येक आठवड्याला दुप्पट इन्सेंटिव्ह व वर्षभरात एकूण ७ लाख ६६० रुपये परतावा मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले होते.

जालना रोडवरील 'हॉटेल रिव्हिएरा एक्झिक्युटिव्ह' येथे साप्ताहिक सेमिनार घेऊन गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढले जात होते. सिडको एन-६ येथील रहिवासी चंद्रकांत भगवानराव जगताप (३०) यांची अशाच प्रकारे फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी ९ फेब्रुवारी २०२३ रोजी सिडको पोलिस ठाण्यात फसवणूक व विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून हे दोन्ही आरोपी पोलिसांना गुंगारा देत फरार होते.

एक हॉटेलचा माजी मॅनेजर तर दुसरा सातवी पास शेतकरी

मुख्य आरोपी श्याम कवडे याचे शिक्षण बी.ए. झाले असून, यापूर्वी तो सिडको परिसरातील मानसी हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून नोकरी करत होता. तर त्याचा साथीदार संतराम कणके हा केवळ सातवी पास असून पूर्वी शेती व्यवसाय करायचा. झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी दोघेही चेन-मार्केटिंगच्या क्षेत्रात उतरले आणि विविध योजनांचे आमिष दाखवून नागरिकांना सदस्य बनवण्याचे काम करू लागले.

सिडको पोलिसांनी सेमिनारमधूनच उचलले

फरार आरोपी जालन्यात अशाच प्रकारचा नवीन कार्यक्रम घेऊन पुन्हा नागरिकांना गंडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती सिडको ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अतुल येरमे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तात्काळ विशेष पथकाला सूचना सेमिनार सुरू असतानाच श्याम कवडे व संतराम कनके या दोघांना कार्यक्रमातून उचलले दिल्या. उपनिरीक्षक अमोल जगताप, हवालदार किरण काळे, अंमलदार अनिल पवार यांच्या पथकाने जालना गाठून सेमिनार सुरु असतानाच संतराम कनके, श्मामराव कवडे या दोघांना कार्यक्रमातून उचलले.

हॉटेलमध्ये दिवाळी सेलिब्रेशन अन सेमिनार ; स्टेटसने केला घात

तीन वर्षे फरार राहिल्यानंतरही या दोन्ही आरोपींनी आपला गोरखधंदा थांबवला नव्हता. त्यांनी जालन्यात व्हिजन हेल्थएनवेल्थ सोल्यूशन्स या नावाने नवीन कंपनी -: सुरू केली होती. या नवीन कंपनीत श्याम कवडे हा स्वतः सी.एम.डी. तर संतराम कनके हा डायमंड पदावर असल्याचे फलक झळकवण्यात आले होते.

सोमवारी (दि. १६ नोव्हेंबर) जालना येथील अंबड चौफुलीजवळील हॉटेल सागर इन येथे सकाळी १० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत या कंपनीचा प्रथम प्रशिक्षण व दिवाळी सेलिब्रेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आरोपी संतराम कनके याने या कार्यक्रमाचे जाहिरात पोस्टर स्वतःच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.