छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर रेल वेस्थानकावर डेक्कन इंडियन ओडिसीचे ४८ पर्यटकांसह शुक्रवारी (दि.८) दुपारी १ वाजता आगमन झाले. पर्यटकांचे आगमन होताच त्यांचे रेल्वे स्थानकांवर महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. या पर्यटकांनी वेरूळ, दौलाताबाद किल्ला आणि परिसरातील प्रदर्शनाला भेट देऊन ते परतीच्या मार्गावर मार्गस्थ झाले.
शुक्रवारी आलेल्या इंडियन ओडिसी पर्यटन हंगामातील ही पाचवी ओडिसी आहे. पहिली २३ सप्टेंबर, दुसरी ११ ऑक्टोबर, तिसरी १४ ऑक्टोबर, चौथी २० ऑक्टोबर तर पाचवी ओडीसी ८ नॉव्हेंबर रोजी दाखल झाली आहे.
शुक्रवारी शहरात आलेली इंडियन ओडिसीची या हंगामातील पाचवी ओडिसी असून या पाच गाड्यांतून १६४ पर्यटकांनी जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांना भेटी दिल्या आहेत. पहिल्या डेक्कन ओडिसीतून १७, दुसऱ्या-५८, तिसऱ्या-१९, चौथ्या-२२ तर पाचव्या इंडियन ओडिसीतून ४८ पर्यटकांनी हजेरी लावली आहे.