

In the central residential area of the city, the tap water is contaminated with sewage
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराच्या मध्यवती भागात असलेला महापालिकेचा प्रभाग क्रमांक ६ मध्ये मूलभूत नागरी सुविधांचा अभाव आहे. ड्रेनेज, पिण्याचे पाणी, रस्ते, स्वच्छता, बाहतूक कोंडी आणि बोकाळलेले अतिक्रमण यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेच्या दुर्लक्षाविरोधात तीव्र नार ाजी व्यक्त होत असून, पूवी तीन स्वतंत्र वॉर्ड असलेला हा परिसर आता एकत्रित प्रभागात समाविष्ट करण्यात आला आहे.
कबाडीपुरा ते नेहरूनगरपर्यंत विस्तारलेल्या या प्रभागाचा बाह्य भाग काही प्रमाणात सुस्थितीत असला तरी अंतर्गत वस्तीतील वास्तव मात्र विदारक आहे. अरुंद गल्ल्या, अपुरी ड्रेनेज व्यवस्था, गुंठेवारी बांधकामे आणि रखडलेली विकासकामे नागरिकांच्या अडचणी वाढवत आहेत. या प्रभागाची एकूण लोकसंख्या ४४ हजार ७०१ इतकी असून, या निवडणुकीत येथून चार नगरसेवक निवडले जाणार आहेत. लोकसंख्या वाढत असतानाही त्या तुलनेत मूलभूत सुविधांचा अभाव आहे.
प्रभाग क्रमांक : सहा अतिक्रमण झाले आहे. अरुंद रस्ते , भरलेले नाले, वाढते धोके कबाडीपुरा, मुगीनाला, फाजिलपुरा, नवाबजानी गल्ली, शहाबाजार, काचीवाडा, नेहरूनगर या भागांत ड्रेनेजची समस्या गंभीर स्वरूपाची आहे. अनेक ठिकाणी नाले कायमस्वरूपी तुंबलेले असून, दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अरुंद रस्ते, झुलते वीजतार आणि अपुरी स्वच्छता व्यवस्था यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. टाइम्स कॉलनी, रशीदपुरा, शहाबाजार आणि फाजिलपुरा परिसरात नाल्यांवर मोठ्या प्रमाणात "पावसाळ्यात पाणी तुंबून रस्ते जलमय होतात. घरांसमोर बांधलेल्या पायऱ्या व वाढवलेले स्लॅब यामुळे आपत्कालीन प्रसंगी रुग्णवाहिकांना प्रवेश करणे कठीण होत आहे. अनेक गल्लींमध्ये घंटागाडी पोहोचू शकत नसल्याने कचऱ्याची समस्या कायमची बनली आहे.
गटारांचे पाणी थेट नळात
प्रभागातील काही भागांत ड्रेनेजचे पाणी थेट नळाच्या पाण्यात मिसळत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. जुनी व जीर्ण ड्रेनेजलाईन, वेळेवर न होणारी दुरुस्ती आणि अपुरी नालासफाईमुळे पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिणामी संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची भावना व्यक्त होत आहे.
पुलासह रस्त्यांची कामे अर्धवट
ऐतिहासिक नौबत दरवाजाजवळील पुलाच्या दोन्ही बाजूंनी रस्ते करण्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. पंचकुआ कब्रस्तानाकडील एका बाजूचा रस्ता पूर्ण झाला असला तरी दुसऱ्या बाजूचे काम नागरिकांनी सहकार्य करूनही रखडलेले आहे. त्यामुळे पुलाचा एकच बाजूने वापर होत असून, दुसऱ्या बाजूला बेकायदा पार्कगिं वाढलेली असल्याने वाहतुकीची कोंडी नित्याची झाली आहे. गेल्या दहा वर्षांत लोटा कारंजा, शहा बाजार, काचीवाडा, एसटी कॉलनीत ड्रेनेजलाईन, रस्ते आणि इतर विकासकामांवर ४० कोटीपेक्षा जास्त निधी खर्च करण्यात आला आहे, अशी माहिती माजी नगरसेवकांनी दिली.
महत्त्वाच्या भागांचा समावेश असूनही दुर्लक्ष
लोटाकारंजा, हर्षनगर, विश्वासनगर, शहाबाजार, मुलूमची बाजार, सराफा, देवडी बाजार, मोहन टॉकीज, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, शासकीय वसाहत, एसटी कॉलनी, टाइम्स कॉलनी, नेहरूनगर यासारख्या महत्त्वाच्या वसाहती व शासकीय कार्यालयांचा या प्रभागात समावेश आहे. असे असूनही विकासकामांकडे दुर्लक्ष होत असून, शहराच्या मध्यवती भागातील प्रभाग क्रमांक ६ मध्ये मूलभूत सुविधांचा अभाव ही गंभीर बाब बनली आहे.