Crime News : सोयगाव तालुक्यात त्रासाला कंटाळून तरुणीने जीवन संपवले

खळबळजनक घटना नांदगाव तांडा शिवारात उघडकीस आली.
Crime News
Crime News : सोयगाव तालुक्यात त्रासाला कंटाळून तरुणीने जीवन संपवलेfile photo
Published on: 
Updated on: 

In Soygaon taluka, a young woman ended her life, driven to the act by the harassment she faced from a young man

वरठाण, पुढारी वृत्तसेवा: सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांडा येथील १७वर्षीय तरुणीने एका तरुणाच्या मानसिक त्रासाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (ता. २२) रात्री आठ वाजता नांदगाव तांडा शिवारात उघडकीस आली.

तेजस्विनी परशुराम चव्हाण (रा. नांदगाव तांडा, ता. सोयगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. गोलू राजू जाधव (रा. सातगाव तांडा, ता. पाचोरा, जि जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

तरुणीच्या पित्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, गोलू जाधव हा तेजस्विनीला नेहमी मोबाईलवर वारंवार कॉल करून लग्नाची गळ घालत असे. माझ्यासोबत लग्न न केल्यास तुझे लग्न होऊ देणार नाही अशी धमकी देत असे. या मानसिक त्रासाला कंटाळून तिने विहिरीत उडी घेतली.

याची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी गुरुवारी रात्री अकरा वाजता मृतदेह विहिरीबाहेर काढला. शुक्रवारी सोयगाव उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रकरणाचा तपास निरीक्षक गोरे करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news