Sambhajinagar News : मराठवाडा मुक्तिसंग्रामला १० वर्षांत पहिल्यांदा इम्तियाज जलील यांची हजेरी

भगव्या कपड्यात दाखल झाल्याने रंगली चर्चा
Sambhajinagar News : मराठवाडा मुक्तिसंग्रामला १० वर्षांत पहिल्यांदा इम्तियाज जलील यांची हजेरी
Published on
Updated on

Imtiaz Jalil attends Marathwada Liberation War for the first time in 10 years

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : निजामाच्या राजवटीतून मराठवाडा मुक्त झाल्याने दरवर्षी साजरा करण्यात येणाऱ्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मागील १० वर्षे आमदार, खासदार असताना सतत दांडी मारली. परंतु, गुरुवारी (दि. १७) पहिल्यांदाच त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावत भगवा झगा परिधान करून उपस्थित झाले. त्यामुळे प्रत्येकांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

Sambhajinagar News : मराठवाडा मुक्तिसंग्रामला १० वर्षांत पहिल्यांदा इम्तियाज जलील यांची हजेरी
Jarange health News : उपोषणाने जरांगे यांची प्रकृती खालावली

मराठवाड्याच्या राजकारणात २०१४ सालापासून एमआयएमने प्रवेश केला. त्यानंतर शिवसेना आणि भाजपने एमआयएम हा हैदराबादच्या निझामाचा पक्ष असल्याचाच आरोप केला. मागील दहा वर्षांत एमआयएम छत्रपती संभाजीनगरच्या स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेसला बाजूला करीत आपले वर्चस्व निर्माण केले. त्यामुळे सध्या एमआयएम विरुद्ध शिवसेना-भाजप असेच चित्र संभाजीनगरमध्ये आहे. त्यात पहिल्यांदा एमआयएमच्या उमेदवारीवर इम्तियाज जलील हे आमदार झाले.

अन् लोकसभा निवडणुकीतही त्यांनी जिल्ह्यातून बाजी मारत शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना पराभूत केले. जिल्ह्याचे आमदार, खासदार असताना २०१४ ते २०२४ या दहा वर्षात एकदाही जलील हे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या हजर राहिले नाही. त्यांच्यावर विरोधकांनी सडकून टीकाही केली.

परंतु, त्यानंतरही त्यांनी हजेरी लावली नाहीच. मात्र, यंदा आमदार, खासदार नसताना एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष जलील यांनी सिद्धार्थ उद्यानातील या कार्यक्रमाला केवळ हजेरीच लावली नाही. तर भगवा झगा घालून ते दाखल झाले. त्यामुळे शिवसेनेसह भाजप, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचेच नव्हे तर वरिष्ठ अधिकारीही आवक झाल्याचे दिसून आले.

Sambhajinagar News : मराठवाडा मुक्तिसंग्रामला १० वर्षांत पहिल्यांदा इम्तियाज जलील यांची हजेरी
Sambhajinagar News : पोलिसांना न सापडलेला ३०-३० घोटाळ्यातील आरोपी ठेवीदारांनीच पकडला

भगवा-हिरवावर मुक्तेदारी नाही

भगवा रंग आणि मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी यावर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील म्हणाले, एखाद्या विषयांवर आमचे राजकीय मतभेद असू शकतात. मी हिरवा शर्ट घातला की, मला हिरवा साप म्हणतात. आता भगवा शर्ट घातला. काय म्हणणार असा सवाल उपस्थित करीत ते म्हणाले भगवा हिरव्यावर कोणाची मक्तेदारी नाही. भगवा रंग कोणाचे कॉपीराईड नाही. याऐवजी प्रत्येकांनी मराठवाड्याच्या विकासासाठी एकत्र यावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news