गुरुधानोरा भागात अवैध दगड उत्खनन

प्रशासन सुस्त, शेतकरी संतप्त
Illegal Stone Quarrying in the Gurudhanora
गुरुधानोरा भागात अवैध दगड उत्खननfile photo
Published on
Updated on

Illegal Stone Quarrying in the Gurudhanora Region

वाळूज, पुढारी वृत्तसेवा शेंदुरवादा परिसरालगतच्या गुरुधानोरा शिवारात अवैध दगड उत्खननाचा गोरखधंदा बिनधास्त सुरू असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. महसूल व प्रदूषण विभागाच्या कथित आशीर्वादामुळे काही माफियांनी स्फोटकांचा वापर करून दगड फोडणे व खडी निर्मितीचे काम दिवस-रात्र सुरू ठेवले आहे.

Illegal Stone Quarrying in the Gurudhanora
शेतकऱ्यानी चक्क गाढवांना खाऊ घातले गुलाबजामून; काय आहे कारण?

याप्रकरणी ग्रामपंचायत, तहसीलदार तसेच प्रदूषण विभागाकडे वारंवार लेखी तक्रारी देऊनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे अवैध उत्खननाचा व्यवसाय अधिकच वाढत असून शासनालाही लाखो रुपयांचा महसूल तोटा सहन करावा लागत आहे.

गुरुधानोरा-धामोरी परिसरातील शेतजमिनींच्या लगत अनेक वर्षांपासून विनापरवाना उत्खनन सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. स्फोटकांच्या कर्कश आवाजामुळे परिसर हादरून जात असून त्यामुळे शेतीसह नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Illegal Stone Quarrying in the Gurudhanora
अनुदान वाटप यादीत महसूल विभागाने चक्क 'बाप'च बदलला

या विरोधात शेतमालकांनी २५ मार्च रोजी संबंधित अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. तीन महिने उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी प्रशासनाने उत्खनन स्थळाची पाहणी केली असली तरी ती केवळ औपचारिकतेपुरतीच मर्यादित राहिल्याचे दिसून येते. महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांकडून केवळ कागदी घोडे नाचवले जात असल्याने हा अवैध प्रकार आजही सुरूच आहे.

यासंदर्भात शेंदुरवादा भागाचे मंडळाधिकारी अनिल हुगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती ऐकून फोन बंद केल्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आ. बंब यांच्याकडे शेतकऱ्यांची धाव

प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी १० जानेवारी रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व वैजापूर उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्र देत प्रकरणाची दखल घेतली. त्यानंतर २५ फेब्रुवारी रोजी संबंधित पथकाने स्थळपाहणी केली. मात्र पाहणीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसल्याची माहिती उपप्रादेशिक अधिकारी अच्युत नादंवटे यांनी १७ एप्रिल रोजी आमदारांना दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news