Robbery Case : सिल्लोडमध्ये बंद घर फोडून ४ लाख २९ हजारांचा ऐवज लंपास

बापूनगरात चोरट्यांचा डल्ला; दागिने, दीड लाखांची रोकड चोरीस
Robbery Case
Robbery Case : सिल्लोडमध्ये बंद घर फोडून ४ लाख २९ हजारांचा ऐवज लंपासfile photo
Published on: 
Updated on: 

House broken into in Sillod; valuables worth 4.29 lakh rupees stolen

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : शहरातील बापूनगर परिसरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि दीड लाख रुपये रोख, असा एकूण ४ लाख २९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. कुटुंबीय लग्नसमारंभासाठी बाहेरगावी गेले असताना ही घरफोडी झाली. २२ नोव्हेंबर रोजी दुपारी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी घरमालक कैसर मोबीन सय्यद यांनी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Robbery Case
Couple robbed : शंकरपूरच्या शेतवस्तीवर दाम्पत्याला शस्त्रांचा धाक दाखवून लुटले

मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल व्यावसायिक कैसर सय्यद (वय ४६) हे २० नोव्हेंबर रोजी पत्नी व दोन मुलांसह नातेवाइकांच्या लग्नासाठी सावळदबारा (ता. सोयगाव) येथे गेले होते. २२ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे तीन वाजता ते घरी परतले असता मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले आढळले. घरातील बेडरूममधील कपाट उघडे होते. लॉकरमधील दागिने आणि रोकड गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

Robbery Case
Ajintha Ghat : अजिंठा घाटात अपघात; ४ किलोमीटर वाहनांच्या रांगा

चोरट्यांनी १ लाख ३५ हजार रुपये किमतीचा ११ ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस, ४० हजारांची पाच ग्रॅमची अंगठी, ४८ हजारांचे सहा ग्रॅमचे कानातील दागिने, ४८ हजारांची सहा ग्रॅमची नथ, आठ हजारांचे चांदीचे पैंजण आणि दीड लाख रुपये रोख, असा एकूण ४ लाख २९ हजारांचा ऐवज चोरून नेला. भरवस्तीत झालेल्या या घरफोडीमुळे बापूनगर परिसरात खळबळ उडाली आहे. सिल्लोड शहर पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.