Chhatrapati Sambhajinagar murder case
प्रेमविवाह खून प्रकरणी चुलत मेव्हण्याला अटक करण्यात आली.File Photo

छ. संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंग| प्रेमविवाह खून प्रकरणी चुलत मेव्हण्याला अटक

प्रेमविवाह केल्याच्या रागातून सासऱ्याने व मेव्हण्याने जावयाला संपविले
Published on

छत्रपती संभाजीनगर : गल्लीतील तरुणीशी आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून नेहमी खुन्नस देणारा सासरा आणि चुलत मेव्हण्याने जावयावर भररस्त्यात चाकुने सपासप वार केले. यात जखमी झालेल्या जावयाने ११ दिवस मृत्यूशी झुंज देत अखेर २५ जुलैला दुपारी दोनच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. याप्रकरणी उपायुक्तांच्या विशेष पथकाने मारेकरी चुलत मेव्हणा अप्पासाहेब किर्तीशाही याला हर्सूल परिसरातून अटक केली आहे. तर सासऱ्याचा शोध सुरु आहे.

Chhatrapati Sambhajinagar murder case
छ. संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंग | बापाने पुसले मुलीचे 'कुंकू'; जावायचा भोसकून खून

गारखेडा परिसर, इंदिरानगरमधील मृत अमित मुरलीधर साळुंके याने गल्लीतील गीताराम किर्तीशाही यांच्या थोरल्या मुलीशी २ मे रोजी प्रेमविवाह केला होता. हा विवाह सोहळा पार पडल्यानंतर गीताराम किर्तीशाही व अप्पासाहेब किर्तीशाही यांनी मुरलीधर साळुंके यांची भेट घेतली होती. यावेळी अमित व त्याच्या पत्नीला आमच्या डोळ्यासमोर तुमच्या घरात राहू देणार नाही अशी धमकी दिली होती. यानंतर १४ जुलै रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास साळुंके कुटुंबियांनी सोबत जेवण केले. जेवणानंतर अमित फिरण्यासाठी घराबाहेर पडताच रात्री पावणेअकराच्या सुमारास सासरा गीताराम किर्तीशाही व चुलत मेव्हणा अप्पासाहेब किर्तीशाही यांनी भररस्त्यात अमितच्या दोन्ही तळ हातासह डाव्या मांडीवर आणि पोटात चाकुने सपासप वार केले होते. अमितच्या किंचाळण्याचा आवाज कानी पडताच साळुंके कुटुंबाने धाव घेत त्याला रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी अमितने सासरा आणि चुलत मेव्हण्याने चाकूहल्ला केल्याचे सांगितले होते.

Chhatrapati Sambhajinagar murder case
औरंगाबाद ‘ऑनर’ किलिंग प्रकरण : थंड डोक्याने आईनेच संपविले…; किर्ती थोरे हत्येवेळी नेमकं काय घडलं…

मयुरी मयूरी लॉन परिसरात सापळा रचून मेव्हण्याला अटक

उपायुक्त नितीन बगाटे यांच्या विशेष पथकाला माहिती मिळाल्यावरुन उपनिरीक्षक विशाल खटके, जमादार शशिकांत सोनवणे आणि विशाल पाटील यांनी शनिवारी दुपारी हर्सूल परिसरातील मयूरी लॉन्ससमोर सापळा रचला. तेथे अप्पासाहेब किर्तीशाही येताच त्याच्या पथकाने मुसक्या आवळल्या. त्याच्या अटकेची क्रांतीचौक पोलीस ठाण्यात नोंद करुन जवाहरनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news