Chhatrapati Sambhajinagar theft: हिराजी बाबा यात्रेत दागिने चोरट्यांचा सुळसुळाट; दोन महिलांना अटक

पिशोर येथे सुरू असलेल्या हिराजी बाबा यात्रेत मागील तीन दिवसांपासून दागिने चोरट्यांचा सुळसुळाट सुरू असून रविवारी रात्री आणखी एक चोरीचा प्रकार उघडकीस आला
Gold  Theft
Gold TheftPudhari
Published on
Updated on

पिशोर : पिशोर येथे सुरू असलेल्या हिराजी बाबा यात्रेत मागील तीन दिवसांपासून दागिने चोरट्यांचा सुळसुळाट सुरू असून रविवारी रात्री आणखी एक चोरीचा प्रकार उघडकीस आला. अलंकार बाजारात खरेदी करत असलेल्या यात्रेकरू महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरण्याचा प्रयत्न करताना दोन महिलांना पकडण्यात आले.

गर्दीचा फायदा घेत वर्षा परमेश्वर चव्हाण आणि शायरी कांतीलाल भोसले (रा. जिवरग टाकळी, हल्ली मुक्काम हसनाबाद, ता. भोकरदन, जि. जालना) यांनी फिर्यादीच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व मण्यांची पोत चोरली. ही बाब लक्षात येताच फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांनी दोघींना पकडून पिशोर पोलिसांच्या ताब्यात दिले.

या घटनेत सुमारे ४६,७५० रुपये किमतीचे अडीच ग्रॅम वजनाचे दोन पळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र तसेच अंदाजे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी असा मौल्यवान ऐवज चोरीस गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पिशोर पोलिसांनी दोन्ही महिलांना अटक करून कन्नड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, आरोपी महिलांनी पोलीस ठाण्यातील बंदीकक्षात धिंगाणा घातल्याची माहितीही समोर आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस बिट जमादार वसंत पाटील व विजय भोटकर करत आहेत. यात्रेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने भाविकांनी सतर्क राहावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव नागवे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news