'सियावर प्रभू रामचंद्र की जय' चा जयघोष

हिंदू नववर्ष शोभायात्रा, सजीव देखावे, टाळ-मृदंगांनी शहर दणाणले
sambhajinagar news
'सियावर प्रभू रामचंद्र की जय' चा जयघोषfile photo
Published on
Updated on

Hindu New Year procession, lively scenes

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी गुढीपाडव्याला गुरुव-ारी (दि. १९) संस्थान गणपती मंदिर येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. सजवलेला रथ, त्यावर श्रीरामांची भव्य मूर्ती, सजीव देखावे, घोडे आणि त्यावर बसलेले मावळे हे शोभायात्रेचे आकर्षण होते. जय श्रीरामच्या जयघोषात, पारंपरिक वेशभूषेत नागरिक मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी झाले होते.

sambhajinagar news
Hingoli Shivjayanti Mahotsav : सहा जणांना शिवछत्रपती गौरव पुरस्कार जाहीर

नववर्ष स्वागत समितीच्यावतीने गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजता श्री संस्थान गणपती मंदिरापासून शोभायात्रेला प्रारंभझाला. स्वागत समितीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत खैरे, राज्याचे बहुजन विकास मंत्री अतुल सावे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय केणेकर, महापौर समीर राजुरकर, स्वागत समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल मालानी, सुभाष पाटील, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, माजी महापौर नंदकुमार घोडेले, सुदाम सोनवणे, महावीर पाटणी, लक्ष्मीनारायण राठी, संजय कांकरिया यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. वारकरी मंडळाच्या बाल वारकरी, महिलांनी टाळमृदंगाच्या तालावर पाऊली खेळत सर्वांचे लक्ष वेधले. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली.

राजे, महाराजांचे सजीव देखावे

या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण शिवसेनेचे उपशहरप्रमुख जयसिंग होलिये, शक्तीसिंग होलिये यांनी १० घोडे, दोन उंट आणि शंभर मावळे आणले. घोड्यांवर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप, बाजीप्रभू देशपांडे आदींची वेशभूषा करीत सजीव देखावे सादर केले. पारंपारिक वेशभूषा परिधान करीत हातात भगवे ध्वज, भाले घेऊन मावळे सहभागी झाले होते. दांडपट्टा चालविणे, तलवारबाजी हे खेळ देखील दाखविण्यात आले. त्यांच्या मागे एका सजवलेल्या रथावर श्रीरामांची भव्य मूर्ती ठेवण्यात आली होती. या रथाच्या मागे आणखी एका सजवलेल्या रथात श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाईंचा सजीव देखावा सादर करण्यात आला.

sambhajinagar news
Jalna News : शहरासह जिल्हाभरात महाशिवरात्री उत्साहात

या मार्गाने निघाली शोभायात्रा

श्री संस्थान गणपती मंदिरापासून निघालेली शोभायात्रा शहागंज, सराफा, सिटीचौक, मछलीखडक, गुलमंडी, संभाजीपेठ मार्गे खडकेश्वर येथील महादेव मंदिराच्या प्रांगणात आली. या ठिकाणी शोभायात्रेची सांगता झाली. खडकेश्वर महादेव मंदिर येथे नाशिक येथील महामंडलेश्वर शिवगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाने समारोप झाला.

ठिकठिकाणी पाणी, सरबतचे वाटप

मिरवणूक मार्गावर विविध व्यापारी, संघटनांच्या वतीने पाणी, सरबतची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांनी त्याचा लाभ घेतला. मुस्लीम समाजाच्या वतीने शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news