

Heavy rains, floods of rivers and canals
सुनील मरकड
खुलताबाद : तालुक्यातील सर्व गावागावांतील सर्व नदी-नाल्यांना पाणी पाणी करून सोडले. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरिजा धरण शंभर टक्के भरून ओसंडून वाहून लागले.
फुलमस्तानी नदीला धडकन भरणारे पाणी येऊन पाण्याने रुद्रावतार धारण केला. फुलामस्तानी नदीच्या रस्त्याने येणाऱ्या सराई, सुलतानपूर, माटरगाव, वडोद, येसगाव अशा अनेक गावांतील शेतात पाणी शिरले. हाताशी आले शेती पीक वाहून गेली. अनेक शेतात पाणी शिरले असून, शेतीला तलावाचे रूप आले आहे.
फुलामस्तानी नदीचा उगम म्हैसमाळ येथून होतो तर शेवट येसगाव येथील गिरीजा मध्य पाणीपुरवठा प्रकल्प येथे होतो. ङ्गमाथा ते पायथाङ्घ येणाऱ्या सर्व गावातील शेती पाण्या खाली गेली असून शेतकरी या पावसाने हातवल झाला. सरकारने आतां कोणतेही पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.
ग्रामसेवक विनायक पवार व कृषी सहाय्यक गोकर्ण पवार यांनी सोमवारी सकाळी पंचनामा व पाहणी केली. यात शेतकरी नारायण बर्डे यांच्या शेतात जाणारा रस्ता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. सोपान कारभारी ठेंगडे यांचे आद्रक पीक पूर्णपणे वाहून गेले. रमेश रघुनाथ ठेंगडे यांच्या लिंबोणीच्या बागेचे मोठे नुकसान झाले असून बागेसह जमिनीवरील सुपीक मातीही पावसाच्या पाण्यात वाहून गेली आहे.
याशिवाय परिसरातील इतर शेतकऱ्यांचे मका, सोयाबीन व कपाशीचे शेकडो एकरवरील पिके पाण्यात बुडाली. तहसीलदारांकडून पाहणीखुलताबाद तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे विविध ठिकाणी शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्या वेदना ऐकून घेत प्रश्न सोडवण्यासाठी तहसीलदार स्वरूप कंकाळे हे स्वतः तालुक्यातील सर्व गावाना ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी टीम सोबत सर्व गावांना भेट देत आहेत.
तालुक्यातील मुमराबाद ते जानेफळ जोडणारा मुख्य रस्त्यावरील धांड नदीवरील पूल वाहून गेला आहे. मौजे मुमराबाद गावाला दुसरा पर्यायी रस्ता नसल्याने गावातील नागरिक गावातच अडकले आहेत.