Chhatrapati Sambhajinagar rain : सिल्लोड, सोयगाव, फुलंब्रीत अतिवृष्टी

जिल्ह्यात ६०.३ मि.मी. पावसाची नोंद, ३ गावांचा तात्पुरता संपर्क तुटला; पिकांना जीवनदान
Chhatrapati Sambhajinagar rain
कन्नड तालुक्यात सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे गांधारी नदीला यावर्षी प्रथमच पूर आला आहे.(छाया : संजय मूचक)
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात मंगळवारपासून पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र, गुरुवारी दिवसभर हलक्या, मध्यम सरी कोसळल्यानंतर रात्रभर सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात ६०.३ मि.मी. पाऊस झाला. त्यामुळे ३३ मंडळांसह सिल्लोड, सोयगाच आणि फुलंब्री या तीन तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची तर छत्रपती संभाजीनगर, पैठणमध्ये अनुक्रमे ६१.२ आणि ६१.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यात सिल्लोडच्या तीन गावांचा तात्पुरता संपर्क तुटला होता.

जिल्ह्यात मान्सूनला सुरुवात झाल्यानंतर जूनमध्ये केवळ ९ दिवसच पाऊस झाला, यात २४, २५ आणि २८ जून असे तीन दिवस पावसाच्या मध्यम सरी कोसळल्या. त्यात जुलैमध्ये दमदार पाऊस होणार, असे संकेत हवामान विभागाने दिल्याने जिल्हात जून अखेरपर्यंत २० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. मात्र, पहिला आठवडा किरकोळ पाऊस बस्सल्यानंतर सलग दोन आठवडे पावसाने दडी मारली. १९ जुलैपर्यंत जिल्हात कुठेही हजेरी लागली नाही. मात्र, त्यानंतर पुन्हा हलक्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली.

Chhatrapati Sambhajinagar rain
Nanded Crime : व्यवसाय वाढीचे आमिष दाखवून ८४ लाखांची फसवणूक; चौघांवर गुन्हा दाखल

दरम्यान, पिके अडचणीत येतील, अशी स्थिती असतानाच जिल्ह्यात सोमवारपासून (दि. २७) पुन्हा पावसाची एन्ट्री झाली. सलग दोन दिवस रिपरिप सुरू राहिली. त्यानंतर गुरुवारी दिवसभर मध्यम व दमदार सरी कोसळल्या. अन् रात्री ११ वाजेनंतर सर्वत्र मुसळधार बरसला. यात ८५ पैकी ३३ मंडळांसह तीन तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसामुळे जिल्ह्यातील पिकांना जीवनदान मिळाले आहे.

या गावांचा तुटला संपर्क

सिल्लोड तालुक्यातील सर्व ११ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. विशेष म्हणजेच सर्वच मंडळात १०० ते १२५ मि.मी. पेक्षा अधिक पाऊस बरसला, त्यामुळे तालुक्यातील नदीला पूर आल्याने केळगाव पुलावरून पाणी वाहिले. त्यामुळे मौजे केळगाव, आधारवाडी, केन्हाळा या तीन गार्वाचा संपर्क काही तास तुटला होता.

Chhatrapati Sambhajinagar rain
Hingoli education scam : बोगस शालार्थ आयडी बनवून बनला शिक्षण सेवक

अतिवृष्टीची मंडळे :

  • छत्रपती संभाजीनगर उस्मानपुरा ६६.३ मि.मी., चिकलठाण २०.५ मि.मी., चितेपिंपळगाव ७२.८ मि.मी., करमाड ७२.८ मि.मी., पिसादेवी ७२ मि.मी., वरुड काझी ७२. मि.मी.

  • पैठण : आडूळ ६९.८ मि.मी., पिंपळगाव ६६.८ मि.मी., बोरकीन ६७ मि.मी., बीडकीन ७६.५ मि.मी., पैठण ७७ मी. मी., निलजगाव ७६.५ मि.मी.

  • कन्नड: चिंचोली ७७ मि.मी., करंजखेड ८२.३ मि.मी. सिल्लोड: सिल्लोड ११५ मि.मी., निल्लोड ९५.८ मि.मी., मराडी १३७३ मि.मी., गोळेगाव- १२६.३ मि.मी., अजिंठा ९३ मि.मी., आमठाण १३७.३ मि.मी., बोरगाव १३७.३ मि.मी., अंभाई १३७.३ मि.मी., पालोद १२६.३ मि.मी., शिवना १०३ मि.मी., उडणगाव- १२६.३ मि.मी., सोयगाव: सोयगाव १४१.८ मि.मी., सावळदबारा

  • ११७.५ मि.मी., बनोटी २७.३ मि.मी., जरंडी १४१.८ मि.मी. फुलंब्री फुलंब्री ७६.८ मी.मी., आळंद ६८ मि.मी., पिरबावडा ६८ मि.मी., वहोदबाजार ६८ मि.मी.

सरासरीच्या ५८.९ टक्के पाऊस : जिल्ह्यात वार्षिक सरासरी पर्जन्यमान हे ४८१.७ मि.मी. एवढ़ा आहे. त्यातुलनेत १ जून ते ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यात ३४२. ५ मि.मी. म्हणजेच सरासरीच्या ५८.२ टक्के पाऊस झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news