Marathwada heavy rainfall : मराठवाडा अतिवृष्टीने सुखावला

सात जिल्ह्यांत रात्रभर मुसळधार
Marathwada heavy rainfall
हिंगोली : मुसळधार पावसामुळे हिंगोलीतील कयाधू नदीला पूर आला असून, त्यामुळे कळमनुरी ते सोडेगाव मार्गावर पाणी आले. पर्यायाने या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद होती.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : दुष्काळाच्या उंबरठ्यावर असलेल्या मराठवाड्यावर अखेर पावसाने कृपादृष्टी दाखवली आहे. बुधवारपासून बरसणाऱ्या पावसाने गुरुवारी मध्यरात्रीपासून ते शुक्रवारी (दि. ३१) पहाटेपर्यंत विभागात मुसळधार हजेरी लावली. त्यामुळे लातूर वगळता मराठवाड्यातील २३३ मंडळांसह जालना, हिंगोली, परभणी आणि नांदेड या चार जिल्ह्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर तब्बल ६७मंडळांमध्ये १०० ते २०० मि.मी. म्हणजे ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. त्यामुळे संपूर्ण मराठवाडा सुखावला असून दुबार पेरणीचे संकट दूर झाले आहे.

मराठवाडयात मान्सूनला सुरुवात झाल्यानंतर जून महिन्यात अखेरपर्यंत पावसाने दडी मारली होती. अखेर शेवटच्या आठवडवात पावसाला सुरुवात झाली. विभागात पहिल्या महिन्यात ११३ मि.मी. झाला. त्यामुळे जून अखेरपर्यंत संपूर्ण मरावाठड्यात शेतक-यांनी पेरप्या उरकल्या होत्या. परंतु, त्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवडयात अतिशय तुरळक स्वरुपाचा आणि त्यानंतर तब्बल दोन आठवडे पाऊस बरसला नाही. त्यामुळे शेतकन्यांची चिंता वाढानी होती.

image-fallback
रश्मिका मंदानाला मिळाला तिसरा हिंदी चित्रपट 

२० जुलैपर्यंत पाऊस नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले होते. विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील विभागात गंभीर झाला होता. परंतु, २२ आणि २४ जुलैला पावसाने मध्यम स्वरूपात हजेरी लावली. तर त्यानंतर २७ जुलैपासून विभागात सर्वत्र पावसाची भुरभुर सुरू झाली.

विभागात बुधवारपासून (दि. २९) पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात झाली, त्यात गुरुवारी दिवसभर रिपरिप बरसल्यानंतर सायंकाळपासून संभाजीनगरसारख्या काही तालुक्यांत आणि जालना, परमणी, हिंगोली, नांदेड जिल्हांत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्रभर मराठवाडचात पावसाचा जोर कमी अधिकप्रमाणात कायम राहिला. त्यामुळे विभागातील तब्बल २३३ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यातील तब्बान ६७ मंडळांमध्ये १०० ते २०० मि.मी. पेक्षाअधिक म्हणजेच ढगफुटीसदृश पाऊस इराला. त्यामुळे काही भागातील नवा प्रवाहित झाल्या.

या गावांचा संपर्क तुटला

मराठवाछ्चात पावसाने पुन्हा कमबॅक केले आहे. रात्रभर विभागात मुसळधार हजेरी लावल्याने छापती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील केळगावकडे जाणाऱ्या पुलावरून मोठ्याप्रमाणात पाणी वाहत होते. त्यामुळे मौजे केळगाव, आधारवाडी, केन्हाळा या तीन गावांचा तात्पुरता संपर्क तुटला होता. अशीच परिस्थिती परभणीतील कळमनुरी तालुक्यात घडली. येथील कान्हेगाव, चिखली, पिंपरी खुर्द, सोहेगाव, नंदापूर, कसबेधावंडा या सहा गावांचा संपर्क तात्पुरता संपर्क तुटला होता.

Marathwada heavy rainfall
Kadvi dam overflow: कडवी मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो; गतवर्षी २५ जुलैला तर यंदा ३१ जुलैला सायंकाळी सहा वाजता धरण भरले

६७ मंडळांत १०० मि.मी. पेक्षा जास्त

मराठवाडयात २३३ मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. त्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये 33 मंडळांमध्ये अतिवृष्टी तर सिल्लोड तालुक्यातील ९ आणि सोयगावमधील 3 मंडळांमध्ये १०० मि.मी. पेक्षा अधिक म्हणजेच ढगफुटीसदृश पाऊस झाला, जालन्यातील ३९ मंडळामध्ये अतिवृष्टीची नौद झाली असून त्यातील १० मंडळांमध्ये बगफुटीसदृश तर बीडमध्ये ६ मंडळांत अतिवृष्टी आणि १ मंडळात १०० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस बरसला. लातुरच्या ४ आणि धाराशिव ३ मंडळांतच अतिवृष्टी झाली. नांदेडमथील ७२ मंडळांमध्ये अतिवृष्टी तर १३ मंडळांमध्ये १०० ते २०० मि.मी. पर्यंत आणि ३ मंडळांत २०० मि.मी. पेक्षा अधिक म्हणजे ढगफुटीसदृश, परभणीत ४७ मंडळांत अतिवृष्टीची तर १३ मंडळांत ढगफुटीसदृश, तर हिंगोलीत २६ मंडळांत अतिवृष्टी आणि १५ मंडळांत ढगफुटीसदृश पाऊस बरसला.

नांदेडमध्ये सर्वाधिक पाऊस

नांदेडच्या किनवट तालुक्यातील मांडया मंडळात २३९.७५ मि.मी., उमरीबाजार २५१.५० मि.मी., माहूर २२३ मि.मी., वाई १२४.५० मि.मी., सिंदखेड १९४.५० मि.मी., दहेली १९४.५० मि.मी. या ६ मंडळांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news