Jail death case : हर्सूल कारागृहातील 47 वर्षीय कैद्याचा मृत्यू

वेळेवर उपचार न मिळाल्याचा नातेवाइकांचा आरोप
Jail death case
र्सूल कारागृहातील 47 वर्षीय कैद्याचा मृत्यूpudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : हर्सूल मध्यवर्ती कारागृहात कच्चा कैदी म्हणून असलेल्या एका 47 वर्षीय व्यक्तीचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. साहेबराव दगडू सोनवणे (रा. गाढे पिंपळगाव, ता. वैजापूर) असे या मृत कैद्याचे नाव आहे. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र जेल प्रशासनाने वेळेवर उपचार न केल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

हर्सूल पोलिस ठाण्याच्या निरीक्षक स्वाती केदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथे जमिनीच्या वादातून एकाची हत्या झाली होती. या गुन्ह्यात साहेबराव सोनवणे यांना अटक करण्यात आली होती. गेल्या 19 महिन्यांपासून ते हर्सूल कारागृहात कच्चा कैदी म्हणून होते.

Jail death case
Chhatrapati Sambhajinagar | हर्मूल कारागृहातील कैद्याचा मृत्यू

सध्या त्यांच्या या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरू होती. कारागृहात असतानाच सोनवणे यांची प्रकृती अचानक बिघडली. मात्र जेल प्रशासनाकडून त्यांच्यावर योग्य उपचार होत नसल्याने त्यांनी थेट मानवाधिकार आयोगाच्या माध्यमातून उपचारासाठी परवानगी मिळवली होती. त्यानंतर त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर मेंदूची शस्त्रक्रियाही पार पडली. महिनाभरापासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या सोनवणे यांचा सोमवारी (दि.13) दुपारी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

जेल प्रशासनाकडून हलगर्जी झाल्याचा आरोप

साहेबराव सोनवणे यांना कारागृहात असताना आजारपणाच्या सुरुवातीलाच वेळेवर आणि योग्य उपचार मिळाले असते, तर त्यांचा नक्कीच जीव वाचला असता, असा दावा त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे. जेल प्रशासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा संताप व्यक्त करत, जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे.

Jail death case
१८ वर्षीय तरुणीला हायवा चालकाने चिरडले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news