

पुढारी वृत्तसेवा : लातूर, हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वादळी पावसाने अर्ध्या मराठवाड्यात विविध ठिकाणी नुकसान झाले. लातूर शहरात मोठ्या प्रमाणावर झाडे उन्मळून पडल्याने विजेचा खेळखंडोबा झाला.
नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यातील महावितरण कंपनीचेही मोठे नुकसान झाले. हिंगोली जिल्ह्यात वादळामुळे केळी व पपईचे प्रचंड नुकसान झाले. पाऊस पडल्याने काही भागांत शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरु केली आहे.