

छत्रपती संभाजीनगर : यंदा मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे राज्य सरकारने यापूर्वीच चौदा अध्यादेश काढून मराठवाड्यासाठी १,४१८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
या मंजूर निधीतून शेतकऱ्यांना मदत वाटप करण्याचे काम सुरू असून सप्टेंबर महिन्यातही खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र नुकसानभरपाईची मागणी उशिराने नोंदविण्यात आली होती. त्यानुसार राज्य सरकारने हिंगोली जिल्ह्यासाठी ६४ कोटी ६१ लाख आणि जालना जिल्ह्यासाठी ८३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्याच्या महसूल विभागाने बुधवारी (दि.15) याबाबतचा अध्यादेश जारी केला.