GPS Ambulances : रुग्णवाहिकांना जीपीएस बंधनकारक

१ डिसेंबरनंतर १० हजारांचा दंड, प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत निर्देश
छत्रपती संभाजीनगर
बैठकीत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा प्रशासक जी. श्रीकांत, प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे आदी.Pudhari News Network
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : रुग्णवाहिका म्हणून नोंद असणाऱ्या वाहनांना जीपीएस बसविणे अनिवार्य आहे. येत्या १ डिसेंबरपर्यंत रुग्णवाहिकाधारकांनी आपल्या वाहनांवर जीपीएस स्वखचनि बसवून घ्यावे व त्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाकडे द्यावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश मंगळवारी झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरण बैठकीत देण्यात आले.

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी होते. मनपा आयुक्त जी. श्रीकांत, अपर आयुक्त रणजीत पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल माने, पोलीस उपायुक्त भुजंग आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात शासकीय रुग्णवाहिकांव्यतिरिक्त अनेक संस्था, धर्मादाय रुग्णालये व खासगी सेवाभावी व्यक्ती रुग्णवाहिका सेवा देत असतात. मात्र या रुग्णवाहिकांना जीपीएस प्रणाली बसविणे आवश्यक आहे. जेणेकरून प्रत्येक रुग्णवाहिकेचा संचार नियमन करता येईल. त्यामुळे सर्व रुग्णवाहिकांना संबंधितांनी स्वखर्चान जीपीएस प्रणाली बसवून त्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे द्यावी. त्यासाठी १ डिसेंबर ही मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर रुग्णवाहिकांची संबंधित यंत्रणांमार्फत तपासणी करून पहिल्यावेळेस १० हजार रुपये दंड, दुसऱ्यावेळी २० हजार रुपये दंड व तिसऱ्या वेळी वाहन जप्त करून नोंदणी निलंबन केले जाईल.

अनेक खासगी रुग्णालयांच्या रुग्णवाहिका या त्यांच्या रुग्णालयांव्यतिरिक्त इतरांना सेवा देत नाहीत, ही बाब गंभीर असून, रुग्णवाहिकेचा मूळ उद्देश यामुळे साध्य होत नाही. तथापि, जीपीएस बसविलेल्या रुग्णवाहिकांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष व महापालिकेच्या स्मार्टसिटी मार्फत जनतेपर्यंत पोहोचविली जाईल जेणेकरून अधिकाधिक लोक ऐन-वेळीच्या मदतीसाठी रुग्णवाहिका चालकांना संपर्क करू शकतील.

ई- रिक्षांचे प्रवासी किराया दर निश्चित

बैठकीत ई- रिक्षांचे प्रवासी भाडेदर निश्चित करण्यात आले. सर्व ई रिक्षांना मीटर बसविणे अनिवार्य असून, ते त्यांनी बसवून घ्यावे. विनाइंडिकेटर रिक्षा चालविणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. महिला प्रवाशांशी गैरवर्तन केल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. जे रिक्षामालक आपली रिक्षा अन्य रिक्षाचालकांना भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी देतात त्यांनी संबंधित चालकाचा परवाना, बक्कल, आधार कार्ड, पत्याचे पुरावे, मोबाईल क्रमांक प्रादेशिक परिवहन कार्यालय, नजीकच्या पोलिस स्टेशनला जमा करावेत असे सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news