

पैठण, पुढारी वृत्तसेवा: गद्दार सरकारने शेतकऱ्यांसंदर्भात राजकारण न करता तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. पैठण तालुक्यातील पाचोड परिसरातील पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पाहणी दौऱ्यात ते आज (दि. ४) बोलत होते.
आदित्य ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पैठण तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी बांधावर जाऊन केली. यावेळी पैठण तहसीलदार सारंग चव्हाण यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामा करून घेण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.