Leopard attack on farmer : अंधाराचा फायदा घेत बिबट्याचा शेत राखणदारावर हल्ला

घोसला परिसरात भीतीचे वातावरण
Leopard attack on farmer
बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेला कुत्रा.pudhari photo
Published on
Updated on

घोसला : येथील एका शेतवस्तीवर झोपलेल्या शेत राखणदार ज्ञानेश्वर पाटील यांच्यावर अंधाराचा फायदा घेऊन बिबट्याने हल्ला केला. मात्र बाजूला झोपलेला सांडू कुत्रा बिबट्यावर भुंकल्याने, चवताळलेल्या बिबट्याने कुत्र्यावर हल्ला चढवला. ही घटना घोसला शिवारात बुधवारी (दि.25) पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. या बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी मात्र बचावला आहे.

घोसला शिवारात शिवारात पिकांच्या संरक्षणासाठी ज्ञानेश्वर पाटील शेतकरी (49) हे आपल्या शेतावर भुईमूग व कांदा बियाणे पिकाची राखण करण्यासाठी शिवारातील गट क्रमांक 166 दररोज राखण करण्यासाठी जातात.

Leopard attack on farmer
Leopard Sighting : तुर्केवाडी, माडवळे, जंगमहट्टी शिवारात बिबट्यासह दोन बछड्यांचे आगमन

शेतशिवारात वीज पुरवठा नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेत राखण करण्याची मोठी अडचण निर्माण होत आहे.घोसला शिवारात शिवारात गेल्या बऱ्याच दिवसांपासून सिंगल फेज वीजपुरवठा बंद केलेला आहे.

काही शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सूचना केल्या असता आम्हा शेत राखण करत असताना हीस्र प्राण्यांपासून खूप मोठ्या प्रमाणात धोका आहे तरीसुद्धा महावितरण कंपनीने याकडे लक्ष दिलेले नाही घोसला. या शिवारात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत बिबटे शेतात येत आहेत, मात्र तरीही महावितरणला अद्याप जाग आलेली नसल्याचे ज्ञानेश्वर पाटील व सर्जेराव पवार यांनी सांगितले.

Leopard attack on farmer
Leopard sighting : बोरगावात दोन बिबट्यांची दहशत

दैव बलवत्तर म्हणून शेतकरी बचावला

पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेल्या शेतकरी यांच्या पाच फूट अंतरावर असलेल्या कुत्र्याने या आपल्या शेतमालक राखणदाराची जबाबदारी घेतल्याने, कुत्र्याने बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेत कुत्रा गंभीर जखमी झाला. या भागात वीजपुरवठा सुरळीत नसल्यानेशेतवस्तीवर शेतकयांना अंधारातच राहावे लागत असल्याची खंत परिसरातील शेतकरी व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news