Agricultural land sale fraud : मुलाकडून वडिलांची दोन कोटींची फसवणूक

न्यायालयाने मुलगा, सुनेचा अटकपूर्व जामीन फेटाळला
Agricultural land sale fraud
लाकडून वडिलांची दोन कोटींची फसवणूकpudhari photo
Published on
Updated on

गंगापूर : शेतजमिनीच्या विक्रीत तब्बल २ कोटी ७ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे म्हणत वडिलांनी मुलगा, सुनेविरुध्द पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, गंगापूर यांनी मुलगा, सुनेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

तालुक्यातील भेंडाळा शिवारातील गट क्रमांक २१४, वर्ग २ मधील १२ हेक्टर ४७ आर जमीन विक्रीत फसवणूक झाल्याची तक्रार ८२ वर्षीय शेतकरी अब्दुल गनी खान पठाण यांनी केली आहे. त्यांनी स्वतःचा मुलगा मुसा खान आणि सून परवीन यांच्याविरुद्ध गंगापूर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे.

Agricultural land sale fraud
Nanded News : 22 नातवंडे असलेल्या 82 वर्षांच्या आजाेबांनी केले दुसरे लग्न

या प्रकरणी २३ जानेवारी रोजी आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रारीनुसार, जमिनीच्या विक्रीतून मिळालेली रक्कम मुलगा व सुनेने स्वतःच्या फायद्यासाठी वापरून वृद्ध वडिलाचा विश्वासघात केला. मुलाने मला फसवले, अशा शब्दांत पठाण यांनी पोलिसांकडे न्यायाची मागणी केली होती.

गुन्हा दाखल झाल्यापासून मुसा खान व परवीन हे फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. अटक टाळण्यासाठी त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा न्यायाधीश एस. बी. बहाळकर यांनी प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित केले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, गंगापूर यांनी मुलगा, सुनेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

Agricultural land sale fraud
Zilla Parishad recruitment fraud : जि. प. च्या नावाने बनावट भरती आदेशांचा सुळसुळाट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news