Fraud of a retired policeman by saying that the parcel came from England
इंग्लंडहून पार्सल आल्याचे सांगून निवृत्त पोलिसाची फसवणूक केली.Pudhari File Photo

इंग्लंडहून ३.७८ कोटींचे पार्सल आल्याचे सांगून निवृत्त पोलिसाला गंडविले; सव्वा लाखाची फसवणूक

मनी लाँड्रिंगच्या केसची दिली धमकी

छत्रपती संभाजीनगर : इंग्लंडहून तुमचे पार्सल दिल्लीत आले असून त्यात ३.७८ कोटी (३ लाख ५९ हजार ५०१ पाउंड) रुपये आलेले आहेत. ते तुम्हाला देण्यासाठी वेगवेगळे चार्जेस लागतील, अशी बतावणी एका निवृत्त पोलिस निरीक्षकाकडून १ लाख २९ हजार ५०० रुपये उकळले असल्याची घटना घटली आहे. तसेच, अटकेची भिती दाखवून त्यांना २२ लाख रुपयांची मागणी केली. हा प्रकार २५ जून ते २१ जुलैदरम्यान घडला. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी दिली.

Fraud of a retired policeman by saying that the parcel came from England
Onion Purchase fraud | कांदा खरेदीत पिंपळनेरच्या व्यापाऱ्याची फसवणूक

इंग्लंडहून पार्सल आलेले सांगुन पैसे उकळले

मिळालेली माहिती अशी की, द्वारकादास चिखलीकर (५८, रा. अरुणोदय कॉलनी) हे फिर्यादी आहेत. ते सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक असून देवळाई चौक येथील बीड बायपास रोडवर असताना त्यांना एक फोन आला की तुमचे इंग्लंडहून एक पार्सल दिल्लीत आले आहे. त्या पार्सलसाठी तुम्हाला २९ हजार ५०० रुपये भरावे लागतील, असे फोनवर सांगितले. त्यानंतर चिखलीकर यांनी कोणतीही खात्री न करता त्यांच्या बँक खात्यावरून ऑनलाइन पद्धतीने २९ हजार ५०० रुपये भरले. त्यांनी पार्सल मोठे असल्याचे सांगुन पुन्हा १ लाख रुपये मागितले असता तेही भरले. काही वेळाने पुन्हा भामट्याचा फोन आला. पार्सलमध्ये ७५ हजार पाउंड (८१ लाख रुपये) आहेत, असे सांगितले. विश्वास बसावा म्हणून त्यांनी १० हजार रुपये चिखलीकर यांच्या बँक खात्यावर पाठविले. व पुन्हा २ लाख ५५४ हजार रुपये मागितले. हे पैसे पाठविले नाही तरीही भामट्यांनी त्यांना पुन्हा फोन करून ७ लाख ८३ हजार ३०० रुपये मागितले. पैसे पाठवित नसल्यामुळे भामट्यांचा वारंवार आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन येत राहिला, मात्र चिखलीकर यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. शेवटी भामट्याने ७५ हजार पाउंडचे पार्सल आलेले असून त्यात खात्यात २ लाख ८४ हजार ५०१ पाउंड असल्याचे आमिष दाखविले. हे पैसे पाउंडमधून भारतीय रुपयांमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी, आरबीआयचा चार्ज, बँक खाते अपग्रेडेशन, टॅक्स आदी कारणे सांगून २५ जूनपर्यंत व्हाट्सॲपवर मेसेज पाठवून पैसे मागत राहिले. यांनंतर चिखलीकरांनी मात्र, त्याला एक रुपयाही दिला नाही.

Fraud of a retired policeman by saying that the parcel came from England
आष्ट्यात शिवनेरी पतसंस्थेची 60 लाख रुपयांची फसवणूक

मनी लाँड्रिंगच्या केसची धमकी

२१ जुलैला भामट्याने पुन्हा द्वारकादास चिखलीकर यांना फोन केला. डिप्लोमॅटिक अधिकारी भारतात येणार आहेत. ते तुमच्या पत्त्यावर येऊन तुम्हाला ३ कोटी ७८ लाख रुपये देणार आहेत. तुम्ही तत्काळ २२ लाख रुपये पाठवा. नाहीतर डिप्लोमॅटिक अधिकाराचा अपमान म्हणून तुम्हाला अटक करावी लागेल, अशी धमकी दिली. २२ लाख रुपये भरा अन्यथा तुमच्यावर मनी लाँड्रिंगची केस होईल. त्यातही तुम्हाला अटक केली जाईल, अशा धमक्या भामटा देत असल्याचे चिखलीकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक ब्रह्मा गिरी करीत आहेत.

Fraud of a retired policeman by saying that the parcel came from England
आष्ट्यात शिवनेरी पतसंस्थेची 60 लाख रुपयांची फसवणूक
logo
Pudhari News
pudhari.news