Crime News : वसुलीची ६८ हजारांची रक्कम हडपण्यासाठी जबरी चोरीचा बनाव

फिल्ड असिस्टंटसह दोन मित्रांचा कट; हात-पाय बांधून चाकूने किरकोळ वार, पोलिसांनी काही तासांत केला पर्दाफाश
Forcible theft
Crime News : वसुलीची ६८ हजारांची रक्कम हडपण्यासाठी जबरी चोरीचा बनावfile photo
Published on
Updated on

Forcible theft was faked to snatch Rs. 68,000 in recovery money

गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : भारत फायनान्शियल कंपनीच्या ग्राहकांकडून वसूल केलेली ६८ हजार ५६ रुपयांची रोकड हडप करण्यासाठी फिल्ड असिस्टंटने दोन मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच लुटीचा बनाव रचल्याचा प्रकार गंगापूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत उघडकीस आणला. हात-पाय बांधून, शर्ट फाडून तसेच अंगावर चाकूने किरकोळ जखमा करून अज्ञात व्यक्तींनी लुटल्याची खोटी कहाणी सांगण्यात आली. मात्र, जबाबातील विसंगती आणि तांत्रिक तपासामुळे हा बनाव उघडकीस आला.

Forcible theft
Airport expansion : विमानतळ विस्तारामुळे ८०० घरांच्या गुंठेवारीचा पेच

याप्रकरणी भारत फायनान्शियलच्या गंगापूर शाखेचे व्यवस्थापक योगेश तुळशीराम गिते (रा. समतानगर, गंगापूर) यांच्या फिर्यादीवरून किरण पंढरीनाथ वैरागर (रा. पानसलाना, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर; हल्ली रा. गंगापूर), रवी ज्ञानदेव दरंदले व आकाश साहेबराव हटकर (दोघेही रा. शनशिगिणापूर, ता. नेवासा) यांच्याविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारत फायनान्शियलमध्ये फिल्ड असिस्टंट म्हणून कार्यरत असलेला किरण वैरागर सोमवारी लासूर परिसरात महिला ग्राहकांकडून कर्जाचे हप्ते वसूल करण्यासाठी गेला होता. सायंकाळी ७.२८ वाजता शाखा व्यवस्थापकांनी त्याच्याशी फोनवर संपर्क साधला असता, आयडीयल स्कूलजवळ आलो असून दहा मिनिटांत कार्यालयात येतो, असे त्याने सांगितले. त्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला. दरम्यान, रात्री १०.०८ वाजता एका अज्ञात व्यक्तीने व्यवस्थापक गिते यांना फोन करून लासूर-गंगापूर रस्त्याच्या कडेला किरण हात-पाय बांधलेल्या अवस्थेत जखमी असल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. किरणच्या डाव्या हाताच्या दंडावर, छातीवर व पाठीवर चाकूच्या किरकोळ जखमा आढळल्या. शर्टही फाटलेला होता.

किरणने चार अनोळखी व्यक्तींनी अडवून शेतात नेले आणि चाकूने वार करून ६८ हजार ५६ रुपये व मोबाईल लुटल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, त्यांच्या जबाबातील विसंगतीमुळे पोलिसांना संशय आला. त्यानंतर सखोल चौकशी व तांत्रिक तपास केल्यानंतर बनावाचा पर्दाफाश झाला.

Forcible theft
Sambhajinagar News : छत्रपती संभाजीराजे साखर उद्योगाला ३.४८ कोटींचा निव्वळ नफा

पैशांच्या अडचणीतून कट

तपासात किरणने मित्र रवी दरंदले याला पैशांची अडचण असल्याचे सांगून वसुलीची रक्कम हडप करण्याचा कट शिल्लेगाव (ता. गंगापूर) परिसरात रचल्याचे समोर आले. या कटात आकाश हटकर यालाही सहभागी करून घेण्यात आले. त्यानुसार २१ सप्टेंबरच्या रात्री लासूर मार्गावरील शिंदेवाडी फाट्याजवळील शेतात किरणला नेण्यात आले. तेथे रवी व आकाश यांनी त्याचे हात-पाय दोरीने बांधून तोंडाला रुमाल बांधला.

त्यानंतर शर्टावर व अंगावर चाकूने किरकोळ वार करून जखमा केल्या. वसुलीची ६८ हजार ५६ रुपयांची रोकड व मोबाईल घेऊन दोघे पसार झाल्याचे तपासात समोर आले. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी जान्हवी शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सलीम चाऊस, सहायक पोलिस निरीक्षक विनायक पाटील, पोलिस उपनिरीक्षक विश्वजित फर्ताडे, पोलिस अंमलदार विजय पाखरे, नरवडे व सातपुते यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news