वैजापुरात तिकिटासाठी रस्सीखेच

जि. प., पं.स निवडणुकीसाठी आतापासूनच इच्छुकांची लॉबिंग
Politician
वैजापुरात तिकिटासाठी रस्सीखेचFile Photo
Published on
Updated on

For the Zilla Parishad and Panchayat Samiti elections, prospective candidates have already started lobbying.

नितीन थोरात

वैजापूर : नगरपालिका निवडणूक संपली असून निकाल जाहीर झाला आहे. मात्र गावखेड्यातील राजकारणाचे खरे स्वरूप ओळखण्याची संधी देणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांकडे कार्यकत्यांचे लक्ष लागले आहे. लवकरच या निवडणुका जाहीर होणार असल्याचे संकेत असतानाच सर्वच राजकीय पक्षांनी कार्यकत्यौना कामाला लावल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.

Politician
Sillod News : पालोद येथील खेळणा नदीवरील पुलाचे काम रखडले

राज्यात शिवसेनाडुभाजपाची युती अस्तित्वात असली तरी वैजापूर तालुक्यात गेल्या पाच वर्षांपासून दोन्ही पक्षांमध्ये सातत्याने संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष अधिक तीव्र होत असून परस्पर आरोपप्रत्यारोपांचे राजकारण सातत्याने रंगताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने नगरपालिकेत अत्यल्प जागा लढवल्याने, तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत ते आक्रमकपणे उतरतील, असे सध्या तरी चित्र दिसत नाही.

नुकत्याच पार पडलेल्या वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढले, तर शिवसेनेने ही लढत एकहाती दिली. या निवडणुकीत भाजपाने स्पष्ट विजय मिळवत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. राष्ट्रवादी काँग्रेसने काही निवडक प्रभागांत उमेदवार उभे करून त्यापैकी काहींना निवडून आणले असले तरी एकूण राजकीय समीकरणात भाजपच वरचढ ठरल्याचे चित्र आहे.

Politician
जि. प.शाळांचा कायापालट करणार : आ. संजना जाधव

भाजपाचे डॉ. दिनेश परदेशी यांनी मिळव-लेला दणदणीत विजय हा केवळ नगरपालिकेपुरता मर्यादित न राहता ग्रामीण राजकारणातही भाजप अधिक ताकदीने उतरणार असल्याचे संकेत देणारा मानला जात आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणाऱ्या तसेच आमदारकीच्या राजकारणासाठी महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यामुळे येत्या काळात या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या काही दिवसांत वैजापूर तालुक्यात भाजप आणि शिवसेनेदरम्यान सुरू असलेले आरोप प्रत्यारोप पाहता, दोन्ही पक्षांमध्ये तडजोड होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. परिणामी, आगामी काळात तालुक्यात भाजप शिवसेना संघर्ष अटळ आहे.

मातब्बर घराण्यांचे राजकारण संपुष्टात ?

वैजापूरच्या मागील ३० वर्षांत वाणी, चिकटगावकर, पाटील यांच्यासह अनेक राजकीय घराण्यांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र बहुतांश दिग्गज नेत्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या घराण्यांतून ठोस नेतृत्व उभे राहिले नाही. काही जण हयात असतानाही प्रभावी नेतृत्व सिद्ध करू शकले नाहीत. उलट अनेकदा त्यांनी दुसऱ्यांना पाठिंबा देत आपली कमकुवत बाजू अधोरेखित केली, त्यामुळे त्यांच्या वर्चस्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत या घराण्यांना आवश्यक यश न मिळाल्यास, या दिग्गज राजकीय घराण्यांना उतरती कळा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news